वाढत्या बेरोजगारी विरोधात A I D Y O चे युवा सम्मेलन संपन्न
हिंगणा :- २६ जून AIDYO च्या ५७ व्या स्थापना दिवसा निमित्य द्वितीय नागपूर जिल्हा युवा सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. सम्मेलनाची अध्यक्षता कॉमरेड शैलेष जनबन्धु आणि कॉमरेड आकाश लोखंडे यांनी केली. सम्मेलनाच्या सुरुवातीला AIDYO च्या महाराष्ट्र राज्य सचिव कॉमरेड माधुरी निकुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
AIDYO च्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्या कॉमरेड सीमा शर्मा यांनी आपल्या उदघाटन भाषणात सांगितले की, आजच्या तरुणाला शिक्षण घेऊनही रोजगरासाठी अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. अशा वेळी तरूणांना स्थाई रोजगार देण्याऐवजी सरकार अग्निपथ सारखी योजना लागू करुन तरुणांची दिशाभूल करित आहे. येवढेच नव्हे तर तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात नशाखोरी व अश्लिल साहित्याचा प्रचार प्रसार करुन तरूणांच्या नैतिकते चा कणा तोडला जात आहे.
या सम्मेलनात नवीन नागपूर जिल्हा कमिटी बनविण्यात आले. यात अध्यक्ष कॉमरेड सोनू लामघरे, सचिव कॉमरेड वृषभ गायकवाड़ सहायक सचिव कॉमरेड रेहान अंसारी कोषाध्यक्ष कॉमरेड दिशा चौधरी व कौंसिल सदस्य आकाश लोखंडे, शुभम सिल्लारे आणि दिक्षा भांगे याना जबाबदारी देण्यात आली. सम्मेलनात अनेक प्रस्ताव बहुमाताने पास करण्यात आले. SUCI कम्युनिस्ट पक्षाचे नागपूर सांघटनिक कमेटी सदस्य कॉमरेड आशिष लोखंडे यांनी नविन कमिटी ला संबोधीत केले.
सम्मेलनात नागपूर च्या विविध क्षेत्रातून तरूणांनी सहभाग घेतला.