सुधाकर जोशी यांचे निधन
नागपूर : महाराष्ट्र बॅंकेचे सेवानिवृत्त चीफ मॅनेजर (डिसिप्लिनरी मॅटर्स) सुधाकर रामचंद्र जोशी यांचे रविवारी सकाळी गोवा येथे निधन झाले. त्यांचे वय 84 वर्षे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अजय, मुली स्वाती साठे आणि डाॅ. अनघा खांडेकर, नातवंड असा परिवार आहे. ते नागपूर येथे अनेक वर्षे शाखा व्यवस्थापक होते.