
रिफ्रेशची ‘व्यसनमुक्ती जनजागृती बाईक रॅली’ यशस्वी
नागपूर: दि २६ जून ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी’ दिनानिमित्य तसेच छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त दुपारी २ वा.(रविवारी) भव्य व्यसनमुक्ती जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी रॅली रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र, लेडीज अँड जेंट्स च्या तसेच कृती समितीच्या वतीने रॅली काढण्यात आली.
व्यसनांबाबत ही संकल्पना रिफ्रेश केंद्राची संचालिका प्रांजली वांढरे (ताल्हण) सचिव सुरेश वांढरे यांची होती. गेल्या पाच वर्षांपासून यशस्वीपणे रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र, लेडीज आणि जेंट्स यशस्वीपणे चालवत आहे. या समाजात व्यसन समस्येबद्दल जनजागृती व्हावी, समाज व्यसनांपासून दूर राहावा, ह्याच उद्देशाने बाईक रॅली अण्णा भाऊसाठे चौक (दिक्षाभूमी) ते संविधान चौक पर्यन्त काढण्यात आली. अण्णाभाऊंच्या प्रतिमेस माल्यार्पण करून रॅलीचे उद्घाटक केतन विकास ठाकरे व प्रा.डॉ. शारदा रोशनखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.
जनसमुदायास व्यसनमुक्ती जागृतिसाठी शुभेच्या दिल्या. व रॅली ला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरवात केली. व्यसनमुक्तीचे नारे आणि घोषणांच्या गजरात बाईक रॅली यशस्वीपणे पूर्ण झाली. संविधान चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्या गेले. समारोपीय कार्यक्रमाच्या वतीने बाईक रॅलीचे समापन झाले.
यामध्ये शरयुताई तायवाडे, वृंदाताई नागपूर, ढोलताशांच्या पथकातील सर्व समूहाचे, व्यसनमुक्ती वर शॉर्ट फिल्म बनवणारे लेखक दिग्दर्शक अनंत घुलक्षे, चित्रपट व नाट्य लेखक दिग्दर्शक सलिम शेख व त्यांच्या पथनाट्याच्या कलावंतांच, तसेच ईतर पाहुण्यांना पुष्प तसेच स्मृतीचिन्ह देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रोटरी क्लब तर्फे प्रांजली वांढरे (ताल्हन) आणि सुरेश वांढरे या दांपत्याचा त्यांच्या सामाजिक कार्याकरिता सत्कार करण्यात आला असून या जनजागृती बाईक रॅलीचे विशेष म्हणजे २६ जून हे ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस’ असल्यामुळे या दिवशी संपूर्ण जगात विविध व्यसनमुक्ती जनजागृती दिवसाचे अवचित्य साधून प्रथमच व्यसनमुक्ती जनजागृती साठीच बाईक रॅली निघाली. रिफ्रेश व्यसनमुक्ती केन्द्र, (लेडीज अँड जेंटस) हे विदर्भातील एक आघाडीचे व्यसनमुक्ती उपचार केंद्र आहे, जेथे पुरुषानं बरोबरच महिलांच्या व्यसनमुक्तीसाठी गेल्या पाच वर्षापासून सातत्याने उपचार करून व्यसनी रुग्णांना ठीक केले.
याप्रसंगी सहभागी प्रांजली वांढरे (ताल्हण) सुरेश वांढरे, शैल जैमिनी, वृदाताई ठाकरे, निर्मलाताई मानमोडे, वृंदाताई नागपुरे, अनिता ठेंगरे, उज्वला कदम, लिना कटारे, मंदाताई देशमुख, डॉ.प्रदीप महाजन, गणेश्वर आरिकर, प्रमोद देशमुख,अनंत घुलक्षे, अनुराग मटकर, पूजा मानमोडे, सविता तायवाडे, अरुणा भोंडे, राजेश ठाकरे व ईतर समाजसेवक यांचा सहभाग होता. बाईक रॅलीमुळे एक व्यसनमुक्ती चा सकारात्मक चांगला संदेश समाजा पर्यन्त पोहचला. आणि समाज प्रबोधनाचे हे सामाजिक कार्य यशस्वी झाले. यशस्वीतेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, रिफ्रेश व्यसनमुक्ती जनजागृती कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच बहुसंख्य समाजातील लोकांचा समावेश होता. सूत्रसंचालन अरुणा भोंडे यांनी तर आभार अनंत घुलक्षे यांनी मानले.