संजय राऊतांच्या घरातच बंडखोरी; सुनील राऊत गुवाहटीच्या दिशेने

संजय राऊतांच्या घरातच बंडखोरी; सुनील राऊत गुवाहटीच्या दिशेने



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आमदार सुनिल राऊत हे देखील गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने सुनिल राऊत नाराज झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आज ते थेट शिंदे गटात सहभागी होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यातून त्यांना मनातील धुसफूस दाखवून द्यायची आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 50 आमदार घेऊन गेल्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. दरम्यान, संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आमदार सुनिल राऊत शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, “माझे कुटुंब मेले तरी चालेल पण मी शिवसेनेसोबत बेईमानी करणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना आमचा श्वास आहे. बोलणारे बोलू देत, जास्तीत जास्त काय होईल सत्ता, खासदारकी जाईल पण शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही शिवसेनेसोबत आहोत असे संजय राऊत म्हणाले आहेत,” अशी स्पष्टोक्ती संजय राऊतांनी केली.

सुनिल राऊत हे सध्या कांजूरमार्ग येथे सभा घेत असल्याचा खुलासा त्यांनी केला. दरम्यान, 2019 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सुनिल राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते. पण, आता स्वतः संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles