जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव, नागपूर

नागपूर:- “पहिला दिवस मजेत गेला ग आई” बाप्पांना घातलेलं साकडं पूर्ण झालं शिक्षक, विद्यार्थी, आईवडील यांची मनातील इच्छा पूर्ण झाली. गेली दोन वर्ष कोरोणा संकटाने विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले, ऑनलाइन शिक्षणाने मुलेही कंटाळली होती. शेवटी कोरोणाच्या भीतीविना शाळेची घंटा वाजली जवाहर गुरुकुल शाळा उच्च प्राथमिक शाळा, नंदनवन येथे नवोगतांचे ज्ञानमंदिरात येताच जय्यत स्वागत करण्यात आले.

शिक्षकांनी आधीपासून विद्यार्थ्यांच्या आगमनाची पूर्वतयारी केली होती. प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे फुलांचा वर्षाव व टिळक लावून स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर त्यांना खाऊ देण्यात आला. पाठ्यपुस्तके, पेन ,पेन्सिल व इतर साहित्य वाटप करण्यात आले. शिक्षकांनी मेहनत घेऊन वर्ग जणू स्वर्गच बनवले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगिनी झाला. त्याचबरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजयजी निंबाळकर सर प्रमुख पाहुणे म्हणून जवाहर गुरुकुल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शास्त्री शिक्षण संस्थेच्या सदस्या श्रीमती.अंकिता मानकर, शाळेचे पालक किशोर दिकोडवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पूर्णिमा भोसले शिक्षिका यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आशा मलखेडे नीता बोधे शिक्षिका,आकाश कोकडे यांनी सहकार्य केले. “शाळेतून चिमुकले घरी परततांना आईला म्हणाले शाळेचा पहिला दिवस मजेत गेला ग आई”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles