ज्येष्ठ नागरिकांनी उर्वरित आयुष्य जगाव कसं ?

ज्येष्ठ नागरिकांनी उर्वरित आयुष्य जगाव कसं ?पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

हिंगणा/वानाडोंगरी :- आयुष्यातील म्हातारपण हा काळ खूपच दुःखाचा आणि त्रासदायक असतो.त्यामुळेच जीव नकोसा वाटते त्याची सेवा करण्यासाठी घरातील कोणत्याच व्यक्तीकडे पुरेसा वेळ नसतो,सर्वच आपल्या कामात व्यस्त असतो.

उतार वयात पत्नीच निस्वार्थी निःसंकोचपणे सेवा करू शकते. दोघांपैकी कोणी एक गेलं की दुसऱ्याला कोणाचा तरी आधार घेऊन दिवस काढावे
लागते. त्याला आपल्या मनाप्रमाणे जगता येत नाही. मग प्रश्न पडतो जगावं ते कोणासाठी आणि का जगावं? असे विचारचक्र त्याच्या डोक्यात सतत चालू असते. त्या-मुळेच मानसिक संतुलन बिघडते एकदा का तो बेडवरचा झाला की,
त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नसतो. आयुष्यातले दिवस
आनंदात असतांना अकस्मात एक निघून जातो, आणि एक निराधार होतो. शेवटी नशिबाला दोष देत माझं कोणीच नाही अशातला प्रश्न नाही, परंतु आत्मीयता नसते.सेवा करणारी व्यक्ती गेली की दिनचर्या
बदलते.त्या काळजीने मन दुःखी होते,सतत विचारामुळे पुरेशी झोप होत नसल्याने प्रकृतीवर परिणाम होते. आई वडिलांची सेवा म्हणजे हीच (ईश्वर) सेवा मानली जाते.

परंतु हल्लीच्या काळात त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. मरण येत
नाही म्हणून जगावं लागते. ज्यांनी आईवडिलांची सेवा केलीच नाही.
त्यांनी दुसऱ्याने आपलं केलंच पाहिजे अशी अपेक्षाच करू नये.
सुखाचे दिवस कसे जातात कळत नाही, पण दुःखाचा एक दिवस
वर्षा सारखा वाटतो.नशिबात
असेल ते भोगावेच लागते.सुखात सर्वच सहभागी होतात परंतु दुःखात कोणीच वाटेकरी नसतो. वयस्क व्यक्तीला आरामाशिवाय कामाचा व्याप नको, परंतु परिस्थिती उलट आहे. त्याला स्वतःचे काम करावे लागते. म्हातारपण कोणालाच सोडत नाही हे माहीत असूनही हल्लीची तरुण पिढी दुर्लक्ष करते.

भविष्याचा विचार करत नाही,
जेंव्हा त्यांच्यावर प्रसंग येतो तेंव्हा
भूतकाळ आठवतो त्यावेळेस वेळ
निघून गेलेली असते. ज्याचं कोणी
करणारं नसते त्याचा वाली
परमेश्वर असतो. म्हणून म्हाताऱ्या
व्यक्तीला मृत्यूशी संघर्ष करण्या- शिवाय कोणताही पर्याय त्याच्याकडे नसतो. तेव्हा त्याला देव आठवतो, होणाऱ्या त्रासामुळे अरे देवा, अरे बाप्पा, आईग असे शब्द अलगदपणे तोंडातून बाहेर पडते शेवटी का होईना देव म्हणून आई बाप्पाची आठवण होते.

देवळात जाऊन पूजा करण्यापेक्षा घरच्या आई वडिलांची सेवा करा तरच
जीवनाचं सार्थक होईलआणि म्हाताऱ्याना उर्वरीत आयुष्य कसं जगायचं ह्याची जाणीव होईल आणि मुलांच्याही स्मरणात राहील
की, आपण आपल्या आई वडीला-साठी काय काय करायला पाहिजे वयस्कर माणसाला आपलं कुठं चुकते ह्याच भान असावं. जिथे आपलं चालत नाही. ज्या ठिकाणी
आपल्या शब्दाला किंमत नाही, तीथे लुडबुड करू नये, शहाणपण
दाखवू नये.मुलांनीसुध्दा मोठ्यांचा आदर करावा, स्वाभिमान बाजूला
ठेवून लहान होऊन जगले तरच
आयुष्याचा उर्वरीत काळ थोडा
चांगला जाऊ शकतो. शेवटी
परमेश्वराचे नामस्मरण करतच
सर्वांनाच जायचे आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles