Home नागपूर ‘स्मरण एका तेजस्विनीचे’ मोठ्या उत्साहात

‘स्मरण एका तेजस्विनीचे’ मोठ्या उत्साहात

41

‘स्मरण एका तेजस्विनीचे’ मोठ्या उत्साहातपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : जाफर नगर, राठोड लॉन, रिंग रोड येथील आयोजित कार्यक्रमात पं.रमाबाईच्या निधन शताब्दी निमित्त ख्रिस्त भक्तमंडळी ने “स्मरण एका तेजस्विनी” चे हा कार्यक्रम २८ जून रोजी, आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

त्यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी पं.रमाबाईच्या भक्ती गीताने केल्यानंतर डॉ.अनुपमा उजगरे यांनी रमाबाईच्या जीवन चित्रपट चित्रफितीद्वारे उलगडून दाखवला. कार्यक्रमाचे आयोजक नितीन सरदार यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांच्या अध्यक्षतेत रमाबाईचे शैक्षणिक कार्य, त्यांनी मूळ भाषणांमधून मराठीत केलेले बायबलचे भाषांतर, पं. रमाबाई लिखित साहित्य, त्यांनी सर्व जाती-धर्मीय विधवा, अंध, अपंग, अनाथ स्त्रियांसाठी केलेलं सामाजिक कार्य आणि पं. रमाबाईचे धर्मांतर ह्यां विषयांवर डॉ. अर्चना लवणे नंदुरबार, रेव्ह डॉ. एलिया मोहोळ पुणे, डॉ. सुभाष पाटील नागपूर, अँड . मार्कस देशमुख पुणे, रेव्ह डॉ. अतुल अधमकर बंगलोर ह्यांनी सादर केलेल्या अभ्यासपूर्ण शोधनिबंधाचे वाचन केले.

अध्यक्षीय समारोपात कवी सुधाकर गायधनी यांनी गोषवारा घेऊन पंडित रमाबाईच्या सेवा कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाची सांगता पाचशे उपस्थितांच्या सभागृहाने उभे राहून पं.रमाबाईंना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अनुपमा उजगरे यांनी केले.