ओबीसी जनजागृती यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन

ओबीसी जनजागृती यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: ओबीसी जनजागृती समितीचे मुख्य संयोजक योगेश ठाकरे व यशवंत तेलंग यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी जनजागृती यात्रा सविधान चौकातून संसद भवन पर्यंत, गुरुवार दिनांक 30 जून रोजी सकाळी 10:30 वाजता. यात्रेला सुरुवात होईल. ती पूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यात फिरून 07 ऑगस्टला संसद भवन नई दिल्ली येथे फिरून जाईल.

याप्रसंगी योगेश ठाकरे, यशवंत तेलंग ओबीसी जनजागृती यात्रे मार्फत 21 लाख स्वाक्षरी निवेदन महामहीम राष्ट्रपती यांना ओबीसीच्या न्यायार्थ निवेदने सादर करतील. या निवेदनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील, जिल्ह्यांतील, व विविध राज्यातील ओबीसी बांधवांच्या स्वाक्षरी, त्यांना त्यांचे आरक्षण, ओबीसींची जनगणना, महाराष्ट्रातील संपूर्ण अंगणवाडी स्तरावरून ग्रामपंचायत मार्फत शासन व प्रशासनाने जनगणना करून सीमित अवधीत हे कार्य पूर्ण करावे. अशी मागणी यावेळी केली आहे.

ओबीसी जनजागृती यात्रा ही संविधान चौकातून सर्वपक्षीय मान्यवर याप्रसंगी आमंत्रित केले असून ही यात्रा नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर ,वर्धा यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, अकोला, पुणे, अमरावती, या विविध मार्गाने मुंबईला आझाद मैदान येथे पोहोचून येथील ओबीसी बांधवांच्या सोबत चर्चात्मक बैठक घेऊन मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, या मार्गांनी पोहोचून जंतर-मंतर संसद भवन नवी दिल्लीत समापन होईल. ओबीसी बांधव व आमदार, खासदार, यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. ही यात्रा वेगवेगळ्या तिथीला भ्रमण करून 7 ऑगस्टला संविधान क्लब व ताल कटोरा स्टेडियम नई दिल्ली येथे योगेश ठाकरे व यशवंत तेलंग यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होईल. समारोपीय कार्यक्रमा मध्ये देशातील, विविध राज्यातील, मान्यवरांना याप्रसंगी निमंत्रित करण्यात येणार आहे. असे योगेश ठाकरे आणि तेलंग यांनी कळविले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles