हिंगण्यातील ज्येष्ठ नागरीकांकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष

हिंगण्यातील ज्येष्ठ नागरीकांकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर, नागपूर

हिंगणा : हिंगणा तहसिल कार्यालयात अनेक ज्येष्ठ नागरिकांना तहसीलदार यांच्याकडे शेती व ईतर कामा संदर्भात यावे लागतात काही नागरिकांची तहसीलदार यांच्या कॅबिनमध्ये पेशी असतात.त्या वेळेस तहसीलदार यांच्या गेटजवळ अनेक नागरीक उभे असतात त्यांना कुठेही बसायला जागा नसल्या मुळे खाली किंवा बाजूला असलेल्या लोखंडी रॉडवर बसावे लागते.

कधी कधी काही म्हाताऱ्याना उभे राहून चक्कर पण येतात तरी तहसीलदार यांनी या नागरिकांना बसण्याची व्यवस्था करावी अशी मागणी कोतेवाडा ( गुमगाव ) येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र आष्ट्णकर यांनी केली.तसेच हिंगणा तालुका जेष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव भोयर हे मागील १५ दिवसापासून आपल्या एका कामाने तहसील कार्यालयात चकरा मारीत आहे.

त्यांनी आपल्या कामाचे कागदपत्रे आवक जावक विभागात जमा केले आता १५ दिवसांनी तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर त्यांना सांगत आहेत की आपण हे काम ऑन लाईन करावे हीच बाब आधीच सांगितली असती तर १५ दिवस ज्येष्ठ नागरिकाला त्रास झाला नसता हा नागरिकांचा एकप्रकारे तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर अपमान करीत आहे. तसेच कार्यालयात अगदी तहसीलदार यांच्या कॅबिन समोर मोठी घाण सुद्धा आहे.असेही वसंतराव भोयर म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles