

राज ठाकरे कोरोनाग्रस्त; शस्त्रक्रिया पुढे ढकलली
मुंबई: पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी लिलावती रुग्णालयात दाखल झालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
राज ठाकरे यांना मागील वर्षीही कोरोनाची लागण झाली होती. मंगळवारी केलेल्या तपासणीमध्ये त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समजले. या बातमीमुळे मनसे कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. मनसेचे सचिव सचिन मोरे म्हणाले, कोविड डेड सेलमुळे भूल देऊ शकत नसल्याने लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.