
राजकारणाचा स्तर घसरत चाललाय; गिरीश महाजन
_पंतप्रधानांवर खालच्या शब्दांत टीका, राज्यात एवढी वाईट स्थिती केव्हाच नव्हती_
जळगाव: पंतप्रधानांना बद्दल कुणीही इतक्या, खालच्या भाषेत बोलत आहेत हे राजकारणाचा स्तर खालावत चालल्याचे द्योतक आहे. त्याबद्दल न बोललेलेच बरे अशी खंत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आज व्यक्त केली.
*एवढी वाईट परिस्थिती!*
राज्यात इतकी वाईट परिस्थिती कधी नव्हती, आपण कुणाबद्दल काय बोलतो,हे कुणाचेच कुणाला भान राहिलेले नाही,असेही महाजन महाजन म्हणाले. शिवसेना नेत्या आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका केली होती या टीकेला प्रत्युत्तर म्हणून अभिनेत्री दिपाली सय्यद यांनीही पंतप्रधानांवर टीका केली होती. या टीकेवरुन भाजप नेते आक्रमक झाले असून या विषयावर गिरीश महाजन यांनीही आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.
*पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा ऑनलाईन संवाद*
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आझादी का अमृतमहोत्सवातंर्गत देशात विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून यानिमित्ताने आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीअंगळवरी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात दूरदृश्य प्रणालीमार्फत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास खासदार उन्मेष पाटील, आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, मनपा आयुक्त डॉ विद्या गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी राहील पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.