सोलापुरात आरक्षणावरून आघाडीवरून बिघाडी

सोलापुरात आरक्षणावरून आघाडीवरून बिघाडी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सोलापूर: महापालिकेच्या निवडणुकीसाठी महिला आरक्षणासंदर्भात चित्र स्पष्ट झाल्यावर आता दिग्गज पुरुष उमेदवारांना तिकीट मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी आघाडीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.

मनपाच्या इतिहासात गत निवडणुकीत (सन 2017) पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली. गटा-तटांच्या राजकारणामुळे मनपात भाजपला व्यवस्थित कारभार करता आला नाही. मात्र ते कारण पुढे करून भाजपवर शरसंधान साधण्यात विरोधक कमी पडले. कारण विरोधकांमध्ये एकी नव्हती. विरोधकांमधील ही बेकी भाजपच्या पथ्यावर पडली, हे सर्वश्रुत आहे.

आता लवकरच होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीतदेखील आघाडीतील बिघाडी होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात आघाडी असली तरी मनपा निवडणुकीत अशी आघाडी होण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय शिवसेना, एमआयएम, वंचित बहुजन आघाडीमधून राष्ट्रवादीत गेलेल्या व जाणार्‍यांचे प्रमाण मोठे असल्याने या सर्वांना न्याय देण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे मोठा पेच निर्माण होणार आहे.

माजी महापौर श्रीकांचना यन्नम व माजी सभागृहनेते शिवानंद पाटील यांच्या प्रभाग क्र. 30 मध्ये अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण पडले नाही. पण मागील प्रभागाचा परिसर निम्मा कमी होऊन नवीन भाग जोडला गेला असला तरी तो काही प्रमाणात अनुकूल आहे. त्यामुळे त्यांना हा प्रभाग फायदेशीरच ठरणार आहे.

माजी उपमहापौर राजेश काळे यांच्या गत प्रभागातील 80 टक्के भाग प्रभाग क्र. 25 ला जोडला गेला आहे. प्रभाग क्र. 24 मध्ये अनुसूचित जमातीचे (पुरुष) आरक्षण पडले आहे. त्यांना ते प्रतिकूल ठरणार असल्याने प्रभाग क्र. 25 मधील सर्वसाधारण जागेवरुन लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हा निर्णय त्यांच्याद़ृष्टीने आव्हानात्मक ठरणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles