ग्रामपंचायतींत उडणार निवडणुकीचा धुराळा

ग्रामपंचायतींत उडणार निवडणुकीचा धुराळापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर_

भंडारा : राज्य निवडणूक आयोगाच्या ३० मे रोजीच्या आदेशानुसार जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आयोगाने २९ नोव्हेंबर २०१९ रोजी दिलेल्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक रद्द केलेल्या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
३ जून २०२२ – विशेष ग्रामसभेची सूचना देणे ( आरक्षणाची सोडत काढण्याकरिता) .
६ जून २०२२- विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढणे (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला)
७ जून २०२२ – सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे
७ जून २०२२ ते १० जून २०२२ – प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी .
१५ जून २०२२ – उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे .
१७ जून २०२२उपविभागीय अधिकाऱ्यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस (नमुना-अ) जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता देणे .
२० जून २०२२ जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना-अ) व्यापक प्रसिद्धी देणे २० जून २०२२.

५ जून मतदान व ६ जून मतमोजणी
राज्य निवडणूक आयोगाकडून निधन, राजीनामा, अनहर्ता किंवा अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांची पोटनिवडणूक जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींमध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी ४ जून २०२२ मतदान पूर्वीचा दिवस, ५ जून मतदानाचा दिवस व ६ जून मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक असलेल्या ४३ ग्रामपंचायत हद्दीतील परवानाप्राप्त मद्यविक्रीची दुकाने संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles