वयोवृद्ध महिला पुन्हा उपोषणाला बसणार

वयोवृद्ध महिला पुन्हा उपोषणाला बसणारपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_एन एच एम महाडीपी प्रकल्प हटविण्याची मागणी_

✍️खेमराज गिऱ्हेपुंजे

जेवनाळा(भंडारा): लोकवस्तीत असलेल्या लिक्वीड प्रकल्पामुळे घरच्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने पासष्ट वर्षीय महिला रखरखत्या उन्हात दुसऱ्यांदा उपोषणाला बसणार आहे.त्यामुळे तालुका प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्न निर्माण होत आहे.

लाखनी तालुक्यातील कणेरी दगडी येथे २०२० ला गावालगत एन एच एम महाडीपी सेंटर लिक्वीड प्रकल्प उभारण्यात आला आहे.मात्र लागूनच घर असलेल्या लता शेंडे यांनी या प्रकल्पातील वास व धुरामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे कारण देत तो प्रकल्प हटविण्याची मागणी अनेकदा केली मात्र त्यांना त्यात यश आले नाही त्यामुळे त्यांनी २१ मार्च ते २३ मार्च ला राहशील कार्यालय लाखनी समोर आमरण उपोषण केला होता त्या नंतर तहसीलदार यांनी महिलेची समज काढत १५ दिवसांमध्ये याचा तपास करू आहे आश्वासन देत उपोषण सोडविले होते.मात्र दिलेलं पंधरा दिवस निघून जाऊन दोन महिने झाले परंतु याचा कसलाही उलगडा न झाल्याने लता शेंडे यांनी दुसऱ्यांदा सहा जूनला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. आता वयोवृद्ध महिला या नवतप्यात उपोषणला बसणार असल्याने तालुका प्रशासन यावर काय निर्णय घेतो याकडे लक्ष लागले आहे.की पुन्हा मागील वेळी प्रमाणे तपास करण्यासाठी वेळ देत प्रकरण थंड करण्याचे प्रयत्न होणार आहेत काय हे बघण्याजोगे आहे.

*दोन्ही पक्षाकडून एकच मागणी.*
मागील दोन वर्षांपासून हे लघु उद्योग प्रकल्प सुरू आहे. हे आत्मा अंतर्गत अनुदानावर तयार केले असून यामध्ये सुगंधित वनस्पतीपासून तेल काढण्याचे काम होते.या प्रकल्पामुळे जवळील घरात धूर व वास येत असल्याचा आरोप उपोषण कर्त्या महिलेने लावले आहे . तर याचे मालक रुपेश नगलवाडे यांचे सांगण्यानुसार येणारा वास हा सुगंधित आहे व धूर येऊ नये म्हणून उपाय योजना केली आहे.त्यामुळे या सततच्या तक्रारीमुळे आम्हालाही त्रास सहन करावं लागत असल्याचे म्हणने आहे. प्रशासनाने लवकरात लवकर स्पष्ट निर्णय देऊन न्याय द्यावा अशी अर्जदार व गैर अर्जदार यांची मागणी आहे.

“मी अनेकदा या संबंधी तक्रार दिली आहे मात्र प्रशासनाला नागरिकांच्या आरोग्याचा काही विचार नाही.मागील वेळी मला जबरदस्तीने उपोषण सोडवायला लावला होता व मागण्या अपुऱ्या राहिल्या आता पुन्हा सहा जूनला तहसील कार्यालय समोर उपोषणाला बसणार आहे.”
*लता शेंडे ,उपोषणकर्ते महिला. कन्हेरी/द.*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles