Home ताज्या घटना नागपूर मनपा: महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीर

नागपूर मनपा: महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीर

69

मनपा नागपूर : महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: नागपूरातील महिलांसाठी राखीव (reserve-women-wards)असलेसल्या 50 टक्के जागांपैकी विविध प्रवर्गांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. शहरतील सुरेश भट (Suresh Bhatt)सभागृहात आगामी नागपूर मनपा निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिलांकरकिता आरक्षित वार्ड इश्वरचिट्ठीद्वारे जाहीर करण्यात आले. (Nagpur NMC Elections 2022 )

वार्डांची एकूण संख्या 151 वरुन 156

राज्यातील 14 महानगरपालिकांमधील निवडणूकीसाठी महिलांच्या आरक्षणाची सोडत आज झाली. यात नागपूरातील महिलांसाठी राखीव असलेसल्या 50 टक्के जागांपैकी विविध प्रवर्गांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यंदा चार ऐवजी तीन वार्डांचा प्रभाग असल्याने प्रभाग संख्या 38 वरुन 52 वर पोहोचली आहे. तसेच वार्डांच्या रचनेतही बदल करण्यात आल्याने वार्डांची एकूण संख्या 151 वरुन 156 वर पोहोचली आहे.

सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित जागा

सर्वसाधारण गटातील महिलांकरिता प्रभाग 31मधून जागा क्र. ब, प्रभाग 22 मधून जागा क्र. ब, प्रभाग 23 मधून जागा क्र. ब, प्रभाग 40 मधून जागा क्र. ब, प्रभाग 32 मधून जागा क्र. ब, प्रभाग 49 मधून जागा क्र. ब, प्रभाग 29 मधून जागा क्र. ब, प्रभाग 35 मधून जागा क्र. ब, प्रभाग 17 मधून जागा क्र. ब, प्रभाग 17 मधून जागा क्र. ब, प्रभाग 48 मधून जाग क्र. ब, प्रभाग 6 मधून जागा क्र. ब, प्रभाग 2 मधून जागा क्र. ब या जागांचा समावेश आहे.

अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातील आरक्षित जागा

अनुसूचित जमाती महिलांकरिता प्रभाग क्र 24 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 11 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 37 मधील जागा क्र. ब, प्रभाग क्र. 12 मधील जागा क्र. ब, प्रभाग क्र. 4 मधील जागा क्र. ब आणि प्रभाग क्र. 51मधील जागा क्र. ब या जागांचा समावेश आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित जागा

अनुसूचित जाती महिलांकरिता प्रभाग क्र 2 मधील जागा क्र अ, क्र. 10 मधील जागा क्र. क, प्रभाग क्र. 43 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 13 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र, 20 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 30 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 27 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 39 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 16 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 37 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 45 मधील जाग क्र. अ, प्रभाग क्र. 1 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 14 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 38 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 15 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 52 मधील जागा क्र. अ या 16 जागांचा समावेश आहे.