पुणे देशातील ‘टेम्पल डिस्ट्रीक्ट’; 10 हजारांपेक्षा जास्त मंदिरे

पुणे देशातील ‘टेम्पल डिस्ट्रीक्ट’; 10 हजारांपेक्षा जास्त मंदिरे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

देशभरात एकूण ७.५ लाख हिंदूची मंदिरे असल्याचे नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सरासरी १,८८६ नागरिकांमागे एक मंदिर आहे. महाराष्ट्रात १,६१२ नागरिकांमागे एकूण ७७ हजार २८३ मंदिरे आहेत. मंदिरांचे शहर म्हणून हरिद्वार, वाराणसी किंवा दक्षिणेतील काही शहरांचा उल्लेख होत असला तरी मराठमोळ्या पुणे शहर आणि जिल्ह्यात देशातील सर्वाधिक १०,०५० मंदिरे असल्याचे आयआयटी पवईच्या एका टीमने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

देशातील मंदिरांची समग्र माहिती एका ठिकाणी उपलब्ध नाही. मंदिरांचे फोटो, व्हिडिओ, माहात्म्य, वेळा आदी एका ठिकाणी मिळावे, मंदिरांची नेमकी संख्या समजावी यासाठी आयआयटी पवईच्या विद्यार्थ्यांच्या एका टीमने जानेवारी २०१९ मध्ये “धर्मविकी’ प्रकल्प हाती घेतला. संगणकशास्त्र व अभियांत्रिकी विभागाचे चेअर प्रोफेसर गणेश रामाकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष माहेश्वरी, अरुण जयरामाकृष्णन, प्रा.साकेत नाथ, प्रा.रवी पूविया प्रकल्पावर काम करत आहेत. देशभरातून २ हजार स्वयंसेवक प्रकल्पाशी जोडले गेले आहेत.

_महाराष्ट्रात १६१२ लोकांमागे एक मंदिर, गोव्यात ८४७, तामिळनाडू ९७०, कर्नाटक १०९८ लोकांमागे आहे एक देवालय​​​​​​​_

*सर्वाधिक मंदिरे*
तामिळनाडू ७९,१५४
महाराष्ट्र ७७,२८३
कर्नाटक ६१,२३२
पश्चिम बंगाल ५३,६५८
गुजरात ४९,९९५
आंध्र प्रदेश ४७,१५२
राजस्थान ३९,३९२
उत्तर प्रदेश ३७,५१८
ओडिसा ३०,८७७
बिहार २९,७४८

*सर्वात कमी मंदिरे*
मिझोराम ३२
नागालँड ४३
सिक्कीम ८७
अरुणाचल ९६
मेघालय १२८
जम्मू-काश्मीर ४७०
मणिपूर ४४१
त्रिपुरा ५६८
पाँडिचेरी १,२०१
गोवा १,८५५

*देशात १८८६ लोकांमागे १ मंदिर*

देशभरातील एकूण ७.५ लाख मंदिरांच्या हिशेबाने सरासरी १८८६ लोकांमागे एक तर महाराष्ट्रात १६१२ लोकांमागे एक मंदिर येते. गोव्यात ८४७ लोकांमागे १ मंदिर आहे. तामिळनाडूत हे प्रमाण ९७०, कर्नाटकात १०९८, आंध्र प्रदेशात ११२३, तेलंगण १३३३, गुजरात १४०८, ओडिशा १४२८, केरळ १५६२, हिमाचल १६३९, तर उत्तर प्रदेश ६२५०, मध्य प्रदेशात ३०३० लोकांमागे तसेच राजस्थानात एका मंदिरामागे २०४० लोक आहेत.

*सर्वाधिक मंदिरे असलेली देशातील टॉप-१० शहरे*
देशातील ७५६ शहरांपैकी सर्वाधिक १००५० मंदिरे पुण्यात आहेत. त्यापाठोपाठ बर्धमान ७९९७, बंगळुरू ७००१, सालेम ५९५४, पूर्व गोदावरी ५८६७, रंगारेड्डी ५८६५, कांचीपुरम ५७९०, ठाणे ५५११, विलूपुरम ५३७४, अहमदाबाद ५३०८, गुंटूरमध्ये ५२३७ मंदिरे आहेत.

*मंदिरांची संख्या अजून मोठी*
देशातील मंदिरांची माहिती संकलित करण्यासाठी लोकसहभागाने हा प्रकल्प हाती घेतला. त्यास तंत्रज्ञानाचे बळ दिल्याने माहितीचे संकलन सोपे झाले. अजूनही मोठ्या प्रमाणात माहिती येत आहे. आता ७.५ लाख मंदिरे दिसत असली तरी ही संख्या कितीतरी मोठी असू शकते.
*-आयुष माहेश्वरी, सदस्य, धर्मविकी प्रकल्प, आयआयटी पवई*

*महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील मंदिरांची संख्या*
नाशिक ४६६६, सातारा ४३३२, अहमदनगर ४१९८, कोल्हापूर ३३९८, औरंगाबाद ३३६४, मंुबई उपनगरे ३२९५, नागपूर ३२२१, रायगड ३०६९, जळगाव २९७६, सोलापूर २९०८, सांगली २७५९, रत्नागिरी २०६३, अमरावती १८९७, सिंधुदुर्ग १७०८, बुलडाणा १५५१, लातूर १५४२, बीड १५३१, नांदेड १३६६, परभणी १०९५, यवतमाळ १०४७, उस्मानाबाद १०३५, जालना ९८८, वर्धा ८६५, मुंबई ८५०, चंद्रपूर ८१३, रायगड ७८६, पालघर ७७४, वाशिम ६८१, हिंगोली ५४२, नंदुरबार ५३०, गोंदिया ३६१, गडचिरोली २०९.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles