महागाई व बेरोजगारी विरोधात संविधान चौकात भव्य निदर्शने

महागाई व बेरोजगारी विरोधात संविधान चौकात भव्य निदर्शने



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: डाव्या पक्षांच्या आवाहनानुसार पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ थांबवा, वाढत्या बेरोजगारीला आळा घाला, रेशन दुकानातून गव्हाचे वाटप सुरू करा, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कर न भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला 7500 रुपये महिना आर्थिक मदत द्या, शहरी भागात रोजगार हमी योजना सुरू करा अशा मागण्यांना घेऊन 25 ते 31 मे पर्यंत देशव्यापी विरोध सप्ताहाचे समापन आज संविधान चौकात रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चाच्या वतीने भव्य प्रदर्शन करून करण्यात आले.

त्याच वेळी महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या बॅलेट पद्धतीने व वार्ड पद्धतीने घेण्यात याव्यात, प्रस्तावित पाण्याची दरवाढ रद्द करण्यात यावी, महानगर पालिकेच्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत अशा स्थानिक मागण्या देखील करण्यात आल्यात.
रिपब्लिकन आघाडी चे घनश्याम फुसे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनिल काळे, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विठ्ठल जुनघरे, जनता दलाचे रमेश शर्मा व एसयूसीआयचे माधव भोंडे यांनी कार्यक्रमाला संबोधित केले.

कार्यक्रमात अरुण लाटकर मनोहर मुळे रामेश्वर चरपे, डॉक्टर विलास सूरकर, विश्वनाथ खांडेकर अरुण वनकर श्याम काळे राजेंद्र साठे अजय शाहू हेमराज चिंचखेडे अरविंद गोडघाटे रवींद्र साखरे अंजली तिरपुडे विजया जांभुळकर प्रीती मेश्राम प्रीती पराते शालिनी सहारे चंद्रकांत बनसोड कुणाल सावंत मोहम्मद ताजुद्दिन विजय खोबरागडे कांचन बोरकर, पिंकी सवाईथुल,गीता मेश्राम, संध्या पिलावण, सारिका जावळे, माया कावळे, रुपलता बोंबले आदी कार्यकर्त्यांसह दोनशेचे वर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles