
मनविसेची पुढील वाटचाल नियोजनबद्ध पध्दतीने; संतोष गांगुर्डे
प्रमोद गाडगे
अकोला:- युवा नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची पुढील वाटचाल ही अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने होणार असल्याचे प्रतिपादन मनविसेचे प्रमुख संघटक व विदर्भ प्रभारी संतोष गांगुर्डे यांनी केले आहे.
संपूर्ण राज्यभर मनविसेच्या पुनर्बांधणीसाठी सुरू असलेल्या संवाद दौऱ्यात अकोला येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात त्यांनी सदर प्रतिपादन केले. मनसे राज्य उपाध्यक्ष व अकोला संपर्क प्रमुख विठ्ठलराव लोखंडकार मनविसे प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे व राज्य उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद दौरा पार पडला.
या संवाद दौऱ्यातील मेळाव्यास , मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे व राजेश काळे, जिल्हा सचिव ललित यावलकर, महानगर अध्यक्ष सौरभ भगत व राकेश शर्मा, संघटक अरविंद शुक्ला, जिल्हा उपाध्यक्ष सतीश फाले व ऍड श्रीरंग तट्टे, मनविसे जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड व भूषण भिरड, जिल्हा उपाध्यक्ष डॉ जय मालोकार, महिला सेनेच्या सौ प्रशंसा अंबेरे आदी मनसे व तालुकाअध्यक्ष- सचिन गालाट, सचिन गव्हाळे, प्रशांत लोथे, विनोद लाहुळकर मनविसे जिल्हा उपाध्यक्ष श्रीरंग तत्ते तसेच मनविसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी श्री गांगुर्डे व पेडणेकर यांनी उपस्थित विद्यार्थी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा करून मार्गदर्शन केले व स्थानिक समस्या जाणून घेतल्या तसेच नविन पक्ष प्रवेश सुद्धा झाले प्रहार पक्षातील करकर्तेनी मनविसेमध्ये प्रवेश केला. संपूर्ण दौऱ्याचा अहवाल मा. अमित साहेबांना सादर करून मनविसे ची पुनर्बांधणी व नूतन कार्यकारिणी बाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन सुद्धा यावेळी दोन्ही संघटकांनी दिले असे मनविसे तर्फे कळविण्यात आले आहे.