
शेतीकरी दिनानिमित्य विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप
_फिरंगोजी व अंतशांतीचा स्तुत्य उपक्रम_
सुभाष चौगले, कुडूत्री(प्रतिनिधी)
कोल्हापूर: वाडीवस्ती व दुर्गम भागातील मुलांच्यात शिक्षणाची रुची आणि गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यभर सामाजिक क्षेत्रातअग्रेसर असणाऱ्या फिरंगोजी आणि अनंतशांती संस्थेच्या वतीने काल शेतीकरी दिनाचे औचित्य साधत कात्रेवाडी-डुबलवाडी येथील २० विद्यार्थ्यांना पावसापासून रक्षण करण्यासाठी रेनकोट वाटप करण्यात आले.या मुळे चिमुकले भारावून गेले.
संस्थेच्या वतीने अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या भागाची निवड करून संस्था दरवर्षी शालेय विद्यार्थी यांचेसाठी रेनकोट वाटप करण्यात येते. रेनकोट वाटप कार्यक्रमास तनुजा विनायक गोडसे व यज्ञेश गोडसे ,स्वप्नील माने,या मावळ्याकडून आर्थिक सहकार्य लाभले.
याप्रसंगी मुख्याध्यापक शांताराम संनगर, पिरळचे युवा नेते संतोष पाटील,रामचंद्र एकावडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,आनंदा म्हाबळे, धोंडीराम शिरसेकर रुपेश म्हाबळे,नामदेव कात्रे,धनाजी कात्रे, दत्तात्रय कात्रे, समिक्षा एकावडे,सविता कात्रे,आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक शांताराम सनगर मनोगतात म्हणाले संस्थेचे उपक्रम खरोखरच चांगले असून,या उपक्रमामुळे दुर्गम,डोंगराळ भागात लहान चिमुकल्यांच्यात निश्चितच शिकण्याची गोडी व रुची वाढेल या वेळी संस्थेच्या उपक्रमाचे त्यानी भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमास फिरंगोजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद प्रमोद पाटील,अनंतशांती संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव,अंनतशांतीचे राधानगरी – भुदरगड अध्यक्ष सुभाष चौगले यांच्या हस्ते रेनकोट वाटप करण्यात आले.