उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचे कौतुक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचे कौतुक



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदी भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली आहे. यावेळी अधिवेशनात नार्वेकर यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच इतर नेत्यांकडून कौतुक करण्यात आले. नार्वेकर हे विधानसभेचे देशातील सर्वात तरूण अध्यक्ष असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

अधिवेशनात फडणवीसांनी नार्वेकरांचे कौतुक करताना म्हणाले, राहुल नार्वेकरांचे कुटुंब हे सावंतवाडीचे आहेत. गोव्यातही त्यांचे वास्तव्य होते, अनेक वर्षांपासून ते मुंबईत राहत आहेत. वडिलांचा समाजकारणाचा वारसा नार्वेकरांना मिळाला आहे. पंधरा वर्ष त्यांनी वकिली केली. अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं योगदान आपण आता देणार आहात, यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्राच्या जनतेला होईल. दोन्ही बाजूंना न्याय देत उत्तम प्रकारचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम कराल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

पुढे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राहुल नार्वेकर देशातील तरुण विधानसभा अध्यक्ष आहेत. विधानसभा अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्तीसारखी आहे. या आधीच्या अध्यक्षांनीही उत्तम काम केले आहे. त्यामुळे त्यांचही फडणवीसांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles