चंद्रपूर ते नेवासा….पहिला प्रवास एकटीने…!

बहरच्या निमित्ताने…..अनुभवलेले क्षण…!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

चंद्रपूर ते नेवासा….पहिला प्रवास एकटीने…!

मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर तर्फे जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित बहर मराठी प्रतिभेचा या ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार , ‘कुसुमाग्रज गौरव सन्मान’ , कवितासंग्रह , विशेषांक प्रकाशन व कवी संमेलन या भरगच्च समारंभास पावनभूमी नेवासा, जि. अहमदनगर येथे मी दि. २५/०२/२०२० रोज मंगळवारला संध्याकाळी ६.०० वाजता ‘डी एन आर’, चंद्रपूर ते पुणे या खाजगी बसने एकटीने आरंभ केला.

बसस्थानकावर यजमान कार्यव्यस्ततेमुळे येऊ शकले नाही . मात्र आमचे चिरंजीव, कन्यारत्न , माझा धाकटा भाऊ आणि त्याचा मित्र असे निरोप देण्यास आले. माझा सातशे किमी एकटीने प्रवास पहिल्यांदा… सर्वांनाच उत्सुकता आणि थोडी धाकधूकही. परंतु बस चालक अजितभाई पठाण परिचित निघाले आणि साऱ्यांची चिंता मिटली. अतिशय कुतूहलाने मीही बसमध्ये आसनस्थ झाले आणि मंडळीचा निरोप घेतला. रात्रभराच्या प्रवासानंतर सकाळी ७.३० वाजता नेवासा फाटा येथे उतरले.
(क्रमशः )

वैशाली उत्तम अंड्रस्कर
तुकुम ता. जि. चंद्रपूर
लेखिका/ कवयित्री/सहप्रशासक/ मुख्य परीक्षक/ संकलक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles