
विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकल्याबद्दल शिंदे – फडणवीस सरकारचे अभिनंदन; रामदास आठवले
मुंबई: विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले आहे. अनुभवी एकनाथ शिंदे आणि ज्ञानोपासक मुत्सद्दी अभ्यासू देवेंद्र फडणवीस या दोघांच्या कुशल नेतृत्वात नवे सरकार महाराष्ट्राचा निश्चित विकास होईल. सर्व समाज घटकांना न्याय देतील असा पूर्ण विश्वास केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज; महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श घेऊन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा विकास घडवतील. राज्यातील दलित आदीवासी अल्पसंख्यांक ; बहुजनांचा विकास ; दरी खोऱ्यात राहणाऱ्या शेतकरी शेतमजूर गरीब कामगारांचा विकास नवे शिंदे फडणवीस सरकार करेल. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र घडविण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संकल्प योग्य असून सरकार च्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खंबीर उभा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या कल्याणकारी कारभारासाठी; विकासात्मक वाटचालीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे ना.रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.