
‘आणवी’तील पिडीतांना न्याय मिळालाच पाहिजे; ऑल इंडिया पँथर सेना
बुलढाणा: चिखली तालुक्यातील आणवी गावातील बौध्द कुटुंबावर जातीयवादी प्रवृतीने हल्ला केला. पीडीतांवरच गंभीर गुन्हा दाखल करून तीन जणांना जेलमध्ये टाकले आहे. जे रक्तबंबाळ झालेत त्यांना जेल आणि ज्यांनी अत्याचार केला ते आजही मोकाट आहेत.
बुलढाणा हॉस्पिटलमधे जखमी पीडित आहे त्याचा साधा जबाब घेण्यासाठी सुद्धा कुणी आले नाही. गावातील जातीयवादी आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बौद्धांची गायरान जमीन लाटण्याचा खेळ करत आहे.
सर्व आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, पिडितांवर दाखल केलेला गुन्हा रद्द झाला पाहिजे, जखमी पिडीताचा जबाब नोंदवला पाहिजे, बौध्द महिलांना तात्काळ संरक्षण दिले पाहिजे.
चिखली पोलीस निरीक्षक आरोपींना पाठीशी घालत आहे त्याची तात्काळ चौकशी करून निलंबन केले पाहिजे, 1978 पासून कसत असलेली जमीन बौद्धांच्या ताब्यात दिली पाहिजे त्यांना तत्काळ सातबारे दिले पाहिजेत.
लवकरात लवकर या मागण्यांची दखल घेतली नाही तर ऑल इंडिया पँथर सेना बुलढाणा जिल्हयात आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. नव्या सरकारच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे या चार दिवसात महाराष्ट्रात अचानक दलित अत्याचार वाढले आहेत. यांच्या हिंदुत्वात आमच्या दलितांच्या संरक्षणाचे काय याच उत्तर नव्या मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे.