
लॉयन्स क्लब नागपूर आयुर्वेदच्या वतीने डॉक्टर्स डे कार्यक्रम संपन्न
नागपूर: नुकत्याच झालेल्या ३ जुलै रोजी सायंकाळी एलेक्सिस हॉस्पिटलच्या सभागृहात लॉयन्स क्लब नागपूर आयुर्वेद तर्फे डॉक्टर्स डे, सीएमई आणि न्यू मेंबर ओरिएंटेशन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात पीडीजी चंद्रकांत सोनटक्के, रिजन चेअर परसन डॉ, विरल शहा यांनी क्लबच्या सभासदाना व नविन सदस्यांना मार्गदर्शन केले. क्लबच्या अध्यक्षा डॉ. पार्वती राणे यांनी क्लबच्या सर्व ज्येष्ठ सदस्यांचे आभार व्यक्त केले व त्यानी सतत योग्य मार्गदर्शन करून क्लबला चालवण्याचे आश्वासन दिले. सचिव डॉ.भावना भलमे यांनी आभार मानले. लायन्स क्लब नागपूर आयुर्वेदाच्या वतीने एलेक्सिस चे डॉ.पुनीत जिंदाल, डॉ.ऋषी लोहिया आणि डॉ.अभिषेक वानकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कोरोना काळात त्यानी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रूग्ण सेवा केली. त्याचप्रमाणे कोरोना संक्रमण काळात जीवाची पर्वा न करता आजारी सेवा देणाऱ्या एलेक्सिस हॉस्पिटलच्या वतीने लायन्सच्या सदस्यांनी आणि एलेक्सिस यांच्यासोबत मिळून आजारी व्यक्तींना मदत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल. डॉ. गोविंद असाटी, डॉ. मृणालिनी थटेरे, डॉ.मंगेश भलमे, डॉ.देवदत्त खोब्रागडे व डॉ. प्रशांत गणोरकर यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी डॉ. संजय थटेरे, सतीश राणे, निरंजन जोशी, अनिकेत धुमाळ यांनी अथक परिश्रम घेतलेत.