होम फर्स्ट फायनान्स कंपनीने व्यावसायिकाची केली लाखोंची फसवणूक

होम फर्स्ट फायनान्स कंपनीने व्यावसायिकाची केली लाखोंची फसवणूक



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: हुडकेश्वर परिसरातील श्री कॉलोनी येथे राहणाऱ्या एका 52 वर्षीय व्यावसायिक यांची होम फर्स्ट फायनान्स कंपनीने लाखोंनी फसवणूक केल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांच्या मदतीने चक्क घरावरच मालकी हक्क ठोकण्याचा गैरप्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, कोराना काळात पीडित व्यावसायिक सुनिल कुर्रेवार यांचे हफ्ते चुकल्याचा गैरफायदा घेत फायनान्स कंपनीने ई-लिलावाद्वारे हा सर्व प्रकार केल्याचे बोलले जात आहे. त्याबाबत सुनील कुर्रेवार यांनी आज आयोजित पत्रपरिषदेत माहिती दिली.

प्राप्त माहितीनुसार, सुनिल कुरैवार व त्यांच्या पत्नी या दोघानी 2017 साली मौजा हुडकेश्वर प्लाट नंबर 68, प.ह.नं. 37, वार्ड नंबर 69/1 जिवनोदय गृहनिर्माण संस्था मर्यादित नागपूर येथील 1212 स्केवयर फिटमध्ये असलेली इमारत घेतली होती. त्या ईमारतीमध्ये खाली 5 दुकाने आणि वर 4 रुमचे घर आहे. यानंतर सुनिल कुरैवार यांनी होम फर्स्ट फायनान्स कंपनी लिमिटेडकडून 20 वर्षाकरिता 32 लाखांचे कर्ज घेतले होते. त्याचवेळी पीडित कुरैवार यांनी अमोल लोदासे नामक व्यक्तीला आपल्या इमारतीवरील 4 खोल्या भाडयावर दिल्या. यानंतर सुनिल कुरेवार यांनी 2017 ते 2019 पर्यंत बँकेचे हफ्ते नियमित भरले. अशातच डिसेंबर 2019 मध्ये सुनिल कुर्रेवार यांना हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर ते आजारी पडल्याने तसेच कारोनाची पहिली लाट आल्याने त्यांनी 2020 ते 2021 हफ्ते त्यांना बँकेला देता आले नाही.

विशेष म्हणजे, कोरोनाच्या काळात केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कर्जधारकांना काही महिन्यांची मुभा देण्यात आली होती. पीडित आजारी असतांना भाडेकरू अमोल लोंदासे यांच्याकडूनही किराया मिळणे बंद झाले. त्यांनतर त्यांना इमारतीमधील खोल्या खाली करण्यास कुर्रेवार यांनी सांगितले. परंतु, लोंदासेने त्यांचे भाडेतत्वारील खोल्या खाली केल्या नाही. दरम्यान कुरैवार यांनी अमोल लोंदासे कोर्टाची नोटीस देत ते न्यायलयात गेले. अशातच होम फर्स्ट फायनान्स कंपनीने हफ्ते चुकल्याने कुरैवार यांना नोटीस बजाविली. यानंतर कुरैवार यांनी कसे बसे आपले बँकेचे हफ्ते देण्यासाठी वारंवार बँकेला मुभा मागितली. परंतु, बँकेने कुठलाही प्रकारचे सहकार्य केले नाही. होम फर्स्ट फायनान्स कंपनीने लोंदासेचे लहान भाऊ मयुर अशोक लौदासे यांच्या नावाने इमारतीचा ई-लिलाव काढून घेतला. तसेच मुळ मालकाला तसचे इमातरीच्या इतर भाडेकरूंना कोणतीही नोटीस किंवा कागदोपत्री पूर्व सूचना न देता होम फर्स्ट फायनान्स कंपनी व मयुर अशोक लोंदासेने कुरैवारांची इमारतीची विक्री केली.

*बँकेने नव्हे तर पोलिसांनी मारून दिले पजेशन*

विशेष म्हणजे, मुळ मालक पीडित सुनिल कुर्रेवार आणि इतर भाडेकरू आजपावतो खोल्यांचे मालकी त्यांचे हक्क असतानाच 27 जून 2022 रोजी हुडकेश्वर पोलिस ठाण्याचे हेडकान्सटेबल शाम कनोजिया व कान्स्टेबल सूर्यवंशी अचानक इमारतीतील खोल्या खाली करण्यास मयुर लोंदासे सोबत पोहचले. मूळ मालक पीडित सुनिल कुरैवार यांनी सर्व फसवणूक झाल्याचे कनोजिया व सूर्यवंशी यांना सांगितले. परंतु, पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे कुरैवारांकडून ऐकून घेतले नाही. तसेच बळजबरीने एक दुकान खाली करून लोंदासे पजेशन मारून दिले. तसेच दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी पीडित सुनिल कुरैवार यांना त्यांच्या मुळ मालकीच्या इमारतीच्या जवळपास आल्यास गुन्हा दाखल करू असा दम दिला. यावर पीडित कुरैवार यांनी पोलिस आयुक्त अमितेष कुमार आणि डीसीपी नरूल हसन यांना लेखी तक्रार दिली. तसेच बँक व लोंदासे यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्याबाबत लेखी तक्रार केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles