मुख्यमंत्री पद मिळाल्याची खंत नाहीच, राज्य नंबरवन करणार; देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री पद मिळाल्याची खंत नाहीच, राज्य नंबरवन करणार; देवेंद्र फडणवीस



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: राजकारणातील चाणक्य समजले जाणारे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरला आले. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. जेपी नड्डा, अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्या संमतीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं. शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव मी दिला. तो मंजूर झाला. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस यांचं पक्षाने खच्चीकरण केल्याचीही चर्चा रंगली होती. पक्षावरील फडणवीसांचं नियंत्रण कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात होतं.

आमचं मॅनडेट पळवून नेण्यात आलं. तेव्हा अनैसर्गिक अलायन्स तयार झालं. अशी आघाडी फार काळ चालत नाही. हे मी आधीच सांगितलं होतं. मला मुख्यमंत्री होता आलं नाही याचा खेद नव्हता. सरकार न आल्याचं दु:ख याासठी होतं. आलेल्या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या गतीला ब्रेक लावला होता. विकासाचे सर्व प्रकल्प थांबवण्यात आले. शेतकरी हिताचे प्रकल्प थांबवले. इंडस्ट्रियल ग्रोथवर त्याचा परिणाम झाला. विदर्भ आणि मराठावाड्याला प्रचंड अन्याय केला. आता महाराष्ट्राची गाडी पटरीवर आणू. मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्र नंबर वन करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदे  यांना मुख्यमंत्री करण्याचा पक्षात निर्णय झाला होता. विशेष म्हणजे शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्तावच मी पक्षाला दिला होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. मला उपमुख्यमंत्रीपदाचा आग्रह केला. त्यामुळे मी ते घेतलं. उलट पक्षाने मला घरी बसण्यास सांगितलं असतं तरी मी घरी बसलो असतो. पण पक्षाने तर उपमुख्यमंत्रीपद देऊन माझा सन्मानच केला. त्यामुळे मला हे पद मिळाल्याची कोणतीच खंत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

शिवसेनेत अस्वस्थता होती. त्यामुळे शिवसेनेत उठाव झाला. त्याला आम्ही साथ दिली. हे बंड नव्हते. तो उठाव होता. आमचा विचार तुडवला जातोय. पक्ष कमी केला जातोय ही खदखद त्यांच्यात होती. त्यामुळे ते आमच्यासोबत आले. आमच्या पक्षाने निर्णय केला. आम्ही सत्तेसाठी हपापलो नाही. आम्ही आग्रह धरला असता तर मुख्यमंत्रीपद आमच्याकडे आलं असतं. आमच्याकडे 115 आमदार होते. पण सत्तेसाठी नव्हे तर विचारा करता शिवसेनेचाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. शिंदेंकडे मुख्यमंत्रीपद गेलं, असं त्यांनी सांगितलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles