मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे भिजत घोंगडे

मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे भिजत घोंगडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_मागण्या तात्काळ मान्य कराव्यात; सम्यक विद्यार्थी आंदोलन_

प्रमोद गाडगे, प्रतिनिधी

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रंलबित मागण्या कुलगुरूंनी मान्य कराव्या त्याकरीता दि.5 जुलै 2022 रोजी मुख्य प्रशासकीय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वाने कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिकत असलेल्या एम.ए.एम.पील. तसेच पीएचडीच्या संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मागण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. वारंवार पाठ पुरावा करूनही संबंधित प्रशासन विद्यापीठ उदासीनता दाखवत आहे. अशा विविध मागण्यांचे भिजत घोंगडे असल्याचे चित्र विद्यापीठात आहे. न्याय हक्काच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे आतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे.

_या आहेत ११ विशेष मागण्या_

१ सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने दिनांक 30 जून ते १ जुलै 2022 रोजी पुकारलेल्या आमरण उपोषणामध्ये त्यांना संवाद व वृत्तपत्र विद्या विभागातील पीएचडी संशोधक विद्यार्थी अमरदीप वानखडे यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून त्याची पी.एच.डी.प्रवेश प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात यावी.
२ ज्या विभागातील विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शक उपलब्ध नाही, त्यांना आंतरविद्याशाखे अंतर्गत दुसऱ्या विषयाचे संशोधक मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याची परवानगी देण्यात यावी.
३ विद्यार्थ्याकडे आंतरविद्या शाखे अंतर्गत इतर विषयाचे संशोधक मार्गदर्शक उपलब्ध आहेत अशा विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची परवानगी देण्यात यावी.
४ जनसंवाद व वृत्तपत्र विभाग आणि फाईन आर्ट हे विषय आंतरविद्या शाखेअंतर्गतच असून प्रशासन त्यांना नाकारत आहे.त्यामुळे दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांचे संशोधकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत जलद गतीने निर्णय घेण्यात यावा.
५ पीएचडी पेट प्रलंबित राहिलेल्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांचे प्रकरणे तात्काळ निकालात काढण्यात यावी.
६ एचडी पेट परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला एका महिन्याची मुदतवाढ देऊन एका महिन्यात सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.
७ विद्यापीठांच्या विविध विभागांची स्वायत्तता रद्द न करता अभाधित ठेवण्यात यावी.
८ कमवा आणि शिका योजनेचे मानधन रू ४००० करण्यात यावे.
९ विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या वस्तीगृहामध्ये सोलर वॉटर बसवण्यात यावे.
१० सिनेट निवडणुकीची नोंदणी तारीख वाढवण्यात यावी.
११ कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा.

सदर निवेदनातील मागण्या मान्य करून त्यांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा लोकशाही पद्धतीने विद्यापीठ प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रकाश इंगळे, महाराष्ट्र प्रदेश सेल मीडिया प्रमुख अमरदीप वानखडे सम्यक विद्यार्थी आंदोलन,एडवोकेट. नागसेन वानखडे, रवींद्र गवई, भास्कर निकाळजे, रामेश्वर कबाडे पाटील, रोहित जोगदंड, अनिल जाधव, अजय जाधव,सुयेश नेत्रगावकर,रोहित जाधव, सुनील वामनराव वाघमारे, विनोद आघाव, विद्या वाघमारे, सविता वाकोडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वाक्षरीसह कुलगुरू यांना निवेदन दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles