बार्टी समतादूत निर्मित युवागटांना एक महिन्याचे उद्योजकता विकास प्रशिक्षण

बार्टी समतादूत निर्मित युवागटांना एक महिन्याचे उद्योजकता विकास प्रशिक्षण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नंददत डेकाटे, नागपूर प्रतिनिधी

हिंगणा:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणा तालुक्यातील व नागपूर शहरातील युवकांना एक महिन्याचे अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम बार्टी समतादूत मार्फत- निर्मित युवागटांना एम.सी.ई.डी उपकेंद्र MIDC हिंगणा येथे देण्यात येत आहे. अशी माहिती हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुंवर यांनी दिली. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एम.सी.ई.डी. उपकेंद्र हिंगणा येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील १८ ते ४५ वर्ष वयोमर्यादा असलेल्या समतादूत मार्फत निर्मित विविध युवा गटातील ६० सदस्यांनी प्रशिक्षणाचा लाभ प्राप्त केला आहे.

युवक युवतींनी उद्योग क्षेत्राकडे आपला कल ओढवून आपली प्रगती साधावी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी पुढे यावे. याही क्षेत्रात आपण चांगली प्रगती साधून इतरांसाठी प्रेरणा बनू शकतो. युवकांनो बेरोजगार राहण्यापेक्षा उद्योजक बनून स्वता:च्या कंपनीचे मालक बना.असे आव्हान धम्मज्योती गजभिये महासंचालक बार्टी पुणे, यांनी युवकांना केले आहे.

उद्योजकता विकास म्हणजे काय? व्यवसायासाठी त्याची काय आवश्यकता आणि उद्योग सुरु करण्यासाठी व्यक्तिची मानसिकता, बँक व्यवहार, बाजारपेठ, प्रकल्प अहवाल, मार्केटिंग, उत्पादन व वस्तुची विक्री, इंडस्ट्री भेट, इत्यादी विषयावर तदन्य मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. तर या प्रशिक्षणार्थ्यांनी आपला उद्योग स्थापन करून विकसित करण्यासाठी बार्टी व एम.सी.ई.डी. द्वारे पाठपुरावा करून सहकार्य केले जाईल. असे हेमंत वाघमारे, राज्य समन्वयक तथा केंद्र प्रमुख mced हिंगणा (नाग.) यांनी सांगितले.

उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम धम्मज्योती गजभिये महासंचालक बार्टी पुणे यांच्या मार्गदर्शनात व हेमंत वाघमारे राज्य समन्वयक तथा केंद्र प्रमुख mced हिंगणा यांच्या नेतृत्वात राबविला जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आलोक मिश्रा विभागीय अधिकारी एम.सी.ई.डी. नागपूर, श्रीकांत कुलकर्णी प्रकल्प अधिकारी एम.सी.ई.डी नागपूर, हृदय गोडबोले समतादूत जिल्हाप्रकल्प अधिकारी नागपूर, हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुंवर, एम.सी.ई.डी. समन्वयक सुषमा चोरपागर, संगीता ढोने, विपिन लाढ़े, पंकज ठाकरे, यांचे सहकार्य लाभत आहे आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles