‘वाडी शहरातील खड्डे बुजवा…हो खड्डे..!’

‘वाडी शहरातील खड्डे बुजवा…हो खड्डे..!’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_नप वाडी मुख्यधिकारी यांना मनसेतर्फे निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा_

अनिल पारखी, नागपूर

हिंगणा: तालुक्यातील वाडी शहरालगत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या मुद्यावरून मनसे वाडीतर्फे आज दि ६ जुलै रोजी मुख्यधिकारी विजय देशमुख साहेब यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी वाडीतील अनेक विषयावर चर्चा करण्यात आली .वाडी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनसे चे प्रदेश सरचिटणीस हेमंत भाऊ गडकरी व नागपूर जिल्हा अध्यक्ष मा सतीश भाऊ कोल्हे यांच्या नेतृत्त्वात शहर मनसे वाडी च्यावतीने नगरपरिषदला अल्टिमेटम देण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत खड्डे बुजविले नाही, तर आंदोलन केले जाईल असा इशाराही मनसे च्या वतीने नप वाडी सीईओ यांना देण्यात आला आहे.

वाडी शहरात मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहे व शहर खड्यांच्या समस्येने ग्रस्त आहे. सद्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्यात पाणी साचले असून डबके बनले आहे. या डबक्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही व शाळा, महाविद्यालये सुरू झाले असून या रस्त्यांवर तर भरपूर खड्डे आहेत.

स्कूलबस, स्कूल ऑटो व वाहन चालकांना रस्त्यावरील खड्यांचा नाहक त्रास होत सहन करावा लागत आहे. वाडी शहराला खड्यांचा प्रश्न भेडसावत आहे. चिखल होऊ गड्यात पाणी भरून राहू नये यासाठी उपाय म्हणून गिट्टी, मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे. पावसाळा सुरू झालेला आहे. परंतु अद्यापही रस्त्यावरील खड्डे तसेच आहेत. दरवर्षी खड्डे बुजविण्याच्या नावाखाली कोट्यावधींची पैस्याची उधळपट्टी केली जाते. मात्र रस्त्यावर खड्डे हे तसेच राहत आहेत. वाडी शहरात रस्त्यावर पडणारे सर्वच खड्डे बुजवा अन्यथा मनसे वाडी रस्त्यावर उतरून या खड्यांच्या विरोधात आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे मनसे तालुका संघटक दीपक ठाकरे व मनसे चे तालुका अध्यक्ष यांनी दिला आहे याची नगरपरिषद वाडी प्रशासनाने दखल घ्यावी ही मनसे तर्फे विनंती

मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत भाऊ गडकरी, जिल्हा अध्यक्ष नागपूर सतीश भाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे अध्यक्ष संघटक दीपक ठाकरे मनसे तालुका अध्यक्ष अनिल पारखी, ओंकार तलमले ,मनसे शहर उपाध्यक्ष वैभव तुपकर,संदीप माने,संतोष पाल, अश्विन कोडापे, मुकेश मुंडले,अजिंक्य वाघमारे, विठोबा घुरडे,बबलू सिंग, विक्की वानखेडे, मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles