न.प.वाडी येथील कंत्राटी सफाई कामगारांचे शोषण बंद करा मनसेची मागणी
अनिल पारखी, नागपूर
हिंगणा: तालुक्यातील नगर परीषद वाडी सफाई कंत्राटी गरीब कामगारांचे शोषण बंद केव्हा होणार. वाडी प्रभागातील माजी व भावी नगरसेवक हे कांत्राटी सफाई कामगारांना न्याय मिळवून देणार का,? किमान वेतन कायद्याचे उलंघन होत आहे असे समाजसेवकांना नगरसेवकांना वाटत नाही काय? असा सवाल मनसेतर्फे विचारला जात आहे.
नप वाडी येथील माजी नगरसेवक भावी नगरसेवक समाजसेवक कामगारांना न्याय 100% मिळवून देऊ शकते. फक्त मानसिकता पाहिजे गरीब कामगाराचा विचार करा 300 रुयये रोजी मध्ये महागाईत घर कसे चालवत असेल थोडा तरी विचार करा. नप येथील नगरसेवकांनी आवाज उचलला तर कोणाचीही हिम्मत होणार नाही, कंत्राटी सफाई कामगारांचे शोषण करायची.
16160 रुपय महिना 26 दिवस अकुशल कामगार जी मिळू शकते त्यावर कामगारांना pf 24% 3878 रुपय महिना कामगाराच्या पीएफ अकाउंट मधे जाऊ शकतो 12% त्यांच्या पगारातून 12% नगरपरिषद कंपनी कडून कामगारांना त्यांच्या मूळ वेतनावर 24% पीएफ कटला पाहिजे असा कायदा आहे त्यांना कामगार विमा कार्ड जॉइंड झाल्यावर 1 महिन्यात मिळायला पाहिजे ह्या त्यांच्या हकाचे आहे गरीबांचा विचार करा मग आपण खरोखरच समाजेवक आहे का? नप ने किमान वेतन च्या रेट च्या खाली टेंडर कसा दिला हा प्रश्न निर्माण करणार आहे कारण हे किमान वेतन कायद्याचे उलंघन त्या ठेकादाराची निविदा का स्वीकारली तुमच्या कांडीशन नुसार जर किमान वेतनापेक्षा कमी रेट असेल तर निविदा स्विकरल्या जाणार नाही असे स्पष्ट नमूद आहे त्या ठेकेदारांला डीसकॉलिफाय करायला पाहिजे होत तसे झाले नाही टर्म कंडीशन नुसार जो बसत आहे त्याला द्यायला पाहिजे होते.
आता तो ठेकेदार किमान वेतन देईल का तो देऊच शकत नाही.किमान वेतन 621 रुपय रोजी आहे त्यांनी भरला 597 रुपय त्याच्यातच pf +esic आहे तो का घरून देईल का आम्ही काही विषय नजरअंदाज करतो म्हणून गरीब लोकावर अन्याय होतो फक्त थोर महापुरुषांचे नाव घ्यायचे त्यांच्या विचाांरावर 10% जरी वागले तरी गरीब जनतेच सार्थक झाल्या शिवाय राहणार नाही. गरीब सफाई कामगारांसाठी आवाज उचला शोषित कामगारांना न्याय द्या.