अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटनेतर्फे सुखदेवजी महाराज यांचा दोन दिवसीय दौरा
नागपूर: अखिल भारतीय अध्यक्ष सुखदेवजी महाराज यांचे विमानतळावर ८ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता आगमन व स्वागत होईल. सुखदेव महाराजां सोबत संजयजी खामतकर संस्थापक, रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री मुंबई, यांची उपस्थिती राहतील. त्यानंतर रवी भवन येथे दुपारी १ वाजता. संस्थेतर्फे सत्कार सोहळा करण्यात येईल. दुपारी ३ वा. श्री संत रविदास छात्रालय भेट व सत्कार होईल आणि सायंकाळी ४ वा. सालई धाम संत रविदास मंदिरात भेट देवून रवीभवन येथे मुक्कामी राहणार असून ज्यांना भेटायचं ते भेटू शकता.
दुसऱ्या दिवशी ९ जुलै शनिवारी सकाळी लोकांच्या भेटी घेऊन ११ ते १ वाजता. पर्यंत रविभवन येथे दुपारी 2 वाजता. संत रविदास या धर्म संघठना बाबत चर्चा त्यानंतर कामठी येथे प्रस्थान. असे फुलचंद मालाधारी, ज्ञानेश्वर बसेशंकर, अनिल काटोले, मधुकर चापके, प्रभाकर राजुस्कर, दामोदर चंगोले यांनी आवाहन केले आहे.