गटसाधन केंद्र भिवापूर येथे सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न

गटसाधन केंद्र भिवापूर येथे सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भिवापूर: दिनांक 8/7/2022 रोजी गट साधन केंद्र पंचायत समिती भिवापूर येथील सभागृहात तालुक्यातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्रीमती ममता ताई शेंडे, सभापती पंचायत समिती भिवापूर तर प्रमुख उपस्थिती मा. श्रीमती माधुरी ताई देशमुख सदस्या पंचायत समिती भिवापूर ह्या होत्या. सदर स्तुत्य उपक्रम श्री. विजय कोकोडे, गटशिक्षणाधिकारी हे पंचायत समिती भिवापूर येथे रुजू झाल्यापासून त्यांच्या संकल्पनेतून एका कृतज्ञ भावनेतून पार पडत आहे.

नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त गोविंदा भोंडे, केंद्रप्रमुख केंद्र कारगाव, श्रीराम वाघे, केंद्रप्रमुख केंद्र महालगाव, श्रीमती शालिनी गुणेकर, मुख्याध्यापिका जी.प. हायस्कूल नांद,
पांडुरंग बुचे मुख्याध्यापक शाळा महालगाव, कमलेश कुमार सवाईमुल मुख्याध्यापक जि प शाळा पहामी व सुभाष तीमांडे मुख्याध्यापक जि प शाळा भिवी टेकडी यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सेवापूर्तीनिमित्त गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला दिलीप शहारे शिक्षण विस्तार अधिकारी, ऋग्वेद भांडारकर शापोआ अधिक्षक तसेच सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख सर्व श्री पिल्लेवान सर, पडोळे सर, टेंभुर्णे सर ,गोमकर सर, नक्षीने सर व राणे सर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खोब्रागडे, मिलिंद मेश्राम ,राधा ताक्सांडे किरण परेकार ,शेरू बागडे,सुषमा काटोले तसेच सर्व विशेष शिक्षक व गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन रिता नेवारे यांनी तर आभार मेघा गुरनुले यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles