नागपुरात पोलीस शिपायाची महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

नागपुरात पोलीस शिपायाची महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_गिट्टीखदान पोलीसात गुन्हा दाखल_

गजानन ढाकुलकर

नागपूर : नागपूर शहर पोलीसात नौकरीवर असलेल्या पोलीस शिपायाने महिला पोलीसाला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सविस्तर वृत्त असे की महीला पोलीस कर्मचारी राधा चिरकुटराव पडवे हि शासकीय वसाहत लाल बिल्डिंग येथे वास्तव्यास आहे तर आरोपी संदिप संपतराव पौनिकर हा सुद्धा त्याच वसाहतीमध्ये रहायला आहे. आरोपी संदिप हा राधाच्या घरी गेला आणि माझी आई तुझ्या घरी आहे काय याची विचारपूस करु लागला, राधाने संदीपला सांगितले की तुझी आई माझ्या घरी नाही,या कारणावरून संदिपचा राग अनावर झाला आणि त्याने घरुन लोखंडी सळई आणून राधाच्या डोक्यावर मारली यात राधा गंभीर जखमी झाली.

राधाचा मुलगा मध्यस्थी करायला आला असता त्यालाही आरोपी संदिप पौनिकरने जबर जखमी केले,राधाच्या घरी असलेल्या पाहुण्या मुलीला सुध्दा संदिपने मारहाण केली. राधाने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलीसांनी संदिप पौनिकर याचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई गिट्टीखदान पोलीस करीत आहेत.

महिला पोलीस कर्मचारी राधा पडवे यांनी एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर पाठवला त्यात त्या म्हणतात कि जर महिला पोलीसच जर सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांना नागपूर पोलीस काय सुरक्षा देणार हे त्यांचं वाक्य नागपूर पोलीसांना चपराकचं म्हणावी लागेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles