संतोष राऊत यांनी निभावले सामाजिक दायित्व
गोंदिया: जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात येत असलेल्या सौंदड येथील पॅराडाईज इंग्लिश स्कूलचे संस्थापक संतोष राऊत यांनी सामाजिक दायित्व म्हणून आज दि ९ जुलै रोजी जिल्हा परिषद शाळेतून जवाहर नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पालकांना मदत केली.
प्रज्वल प्रकाश वैद्य वर्ग सहावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनेरी येथील विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव बांध येथे निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांची तल्लख बुद्धिमत्ता पाहून पॅराडाईज इंग्लिश स्कूलचे संस्थापक संतोष राऊत व मुख्याध्यापिका राजश्री बडोले यांनी त्यांच्या घरी जाऊन सामाजिक दायित्व पालन करण्यासाठी त्या मुलाचेअभिनंदन केले व अल्पशी भेट देऊनू देऊन मदत केली व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व भविष्यात सुद्धा मदत करण्याचे आश्वासन दिले.