शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धा ‘आस सावलीची’ सर्वोत्कृष्ट रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : आस सावलीची☄*
*🍂शनिवार : ०९/ जुलै /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*आस सावलीची*

आम्ही वारकरी ! वाट पंढरीची !!
आस सावलीची ! माऊलीच्या !!

भेटू पांडूरंगा ! अंतरीची आस !!
वारकरी खास ! पथदर्शी !!

वारी आषाढीची ! मनी खूणगाठ !!
कणा ठेऊ ताठ ! स्वाभिमानी !!

मूर्ती तुझी पाहू ! नाम तुझे घेऊ !!
एकसंघ होऊ ! एकादशी !!

मनी नाही तमा ! ऊन पावसाची ! !
आस रिंगणाची ! भक्तीमय !!

आस सावलीची ! चंद्रभागा तीर्थ ! !
अष्ठगंध सार्थ !! विश्वनाथा !!

ऊरी अभिमान ! भगवी पताका ! !
विचार शलाका ! समतेची !!

✍️ *श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌷🚩➿➿➿➿
*आस सावलीची*

शिणलो दयाळा | बहु या संसारी |
भव दुःख हारी | दीनानाथा ||१||

संसार सागर | मायेचा पसारा |
मना नसे थारा | जीवनात ||२||

झाली संध्याकाळ | आयुष्याची आता |
विचारी न दाता | कुणी आप्त ||३||

देवा पांडुरंगा | झालो निराधार |
दे मज आधार | तुझ्या ठायी ||४||

तुच मायबाप | भक्तांची माऊली |
मायेची सावली | सदोदित ||५||

तुझा नाम जप | करीतो चिंतन |
सावरी जीवन | दयानिधी||६||

लागलीया मना | ओढ दर्शनाची |
आस सावलीची | अंतरात ||७||

कृपाछत्र तुझे | धर भक्तावरी |
तुझ्या वाटेवरी | नेत्र लागी ||८||

तुच ब्रम्ह सत्य | शक्ती रूप धाम |
तारी तुझे नाम | विठूराया ||९||

*श्रीमती सुलोचना मुरलीधर लडवे*
साईनगर,अमरावती
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌷🚩➿➿➿➿
*आस सावलीची*

“तुमच्याविना मी सांगा
कसं शिखर गाठणार”
“आस सावलीची मला
त्याशिवाय नाही जमणार”

“आशीर्वाद मजला हवा
तुमच्याविना नाही देणार”
“नाही कोणाचा भरवसा
तुमचीच सावली घेणार”

“या पामरास देता का?
कोणी थोडीतरी सावली”
“साहित्यातला मी वारकरी
भेटेल मला माय माऊली”

“मजला आस लागली
जशी भंगवंतास भेटण्यास”
“तशी आस सावलीची
साहित्यिक गुरू मिळण्यास”

“गुरुविना नाही कोणी
हो मोठा या जगतात”
“म्हणून तर गुरू श्रेष्ठ
असतात असे म्हणतात”

*✍️ श्री हणमंत गोरे*
*मुपो:घेरडी,ता:सांगोला,जि:सोलापूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌷🚩➿➿➿➿
*आस सावलीची*

खूप राबले उन्हातान्हात
आता वाटे थांबावे कुठे
रापलेले हात आणी
थकलेल्या पायात कळ उठे

सरली कितीतरी वर्षे
झोप नाही डोळ्यात
काबाडकष्ट करतांना
काटा रूतला पायात

मुठभर धान्यासाठी
दिवसभर राबराबले
देहावरील घामासंगे
डोळेही डबडबले

दिवस सरले वय सरले
थकली सारी गात्र
देहातली ताकद सरली
संपत आली रात्र

वणव्यात दुःखाच्या
शितलता माऊलीची
चालतांना पाऊले
एक आस सावलीची

*सविता धमगाये नागपूर*
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌷🚩➿➿➿➿
*आस सावलीची*

आई मी खूप लहान
मला तुझी गरज आहे
आई तू जाते ग कामाला
मी तू येण्याची वाट पाहे…..

खेळते दिवसभर आजोबाबरोबर
आजी जेवायला देते मला
सवंगड्यांशी खेळते,नाचते
माझी आठवण येते का तुला?……

आस सावलीची तुझ्या मायेची
आठवण सतत तुझीच येते
कशीतरी मन रमवते बाहुलीत
गाड्यांशीही खेळून खूप दमते….

आई आई आई लवकर ये
मला कुशीत घेवून पापी घे……

*वसुधा नाईक,पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌷🚩➿➿➿➿
*आस सावलीची*

तवा भेटीची आस मज लागली पांडुरंगा
वाहे दुथडी भरून नदी माय चंद्रभागा

मुखी नाम घोष विठ्ठल विठ्ठल जय हरी
थकले आता पाय, करून ही वारी

मंदिराचा कळस दिसता मज डोळ्यास
आस सावलीची लागली मनास

शीण थकल्याचा क्षणात गेला निघून दूर
तुझ्या भेटीची लागली मज हुरहुर

आलो वारीत चालून दर्शनासाठी तुझ्या दारी देवा
जन्मोजन्मी घडू दे आता तुझीच सेवा

आस सावलीची आम्हा भक्तांच्या अंतरात
तुझीच मूर्ती निरंतर राहे मन मंदिरात

*सौ. अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌷🚩➿➿➿➿

➿➿➿➿✒️🙏🏻✒️➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सौ वैशाली अंड्रस्कर 9850360212 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿

*आस सावलीची*

वाड वडिलांनी
जाणूनिया सत्य
वाट चालविली
पंढरीची नित्य

कृपासिंधु हरी
सावळा मुरारी
युगे अठ्ठावीस
उभा विटेवरी

तुझ्या राऊळाची
दिसे दिव्य शोभा
भगव्या पताका
भिडल्यात नभा

चंदनाचा टिळा
वैजयंती माळा
चंद्रभागा तीरी
नाचे गोतावळा

दर्शनाची तुझ्या
हृदयात आस
उजाडला आज
सोनियाचा दिस

विठृठला दयाळा
दिनांच्या रे नाथा
तुझ्या पावलांशी
टेकवितो माथा

धन्य भेट झाली
गुरु माऊलींची
नको अन्य काही
आस सावलीची

*सौ.संगीता पांढरे*
*इंदापूर, पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌷🚩➿➿➿➿
*आस सावलीची*

देह रमलासे पंढरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
वारकरी एकमुखाने बोले
जय जय रामकृष्ण हरी ॥

दर्शनाला उभा विटी पांडुरंगा
लागली आस सावलीची
अविट गोडी तुजिया अभंगा
जन्मभरी पुजा पावलांची ॥

भक्ती वृक्षाची सावली
डहाळी पाकळी फुल वेली
शिणले दमले विसावती
दीनाची मुर्ती विठुमाऊली ॥

आशेने येती भिवने तिरी
नित्यनेमी करीतो वारी
निराशा पापभंगा धुळ
निर्मळले चंद्रभागा सरी ॥

*प.सु. किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌷🚩➿➿➿➿
*आस सावलीची*

मनातील हर्ष आनंद
हक्कानं सांगण्याचं स्थान
आस सावलीची या
मैत्री सर्व नात्यांहून महान

सुखदुःखाच्या प्रसंगात
पाठीशी उभं राहणारी
होईल रे सगळं ठीक असं
सतत ठणकावून सांगणारी

आस या सावलीची इथे
असतं निरागसपणे विरघळायच
शुद्ध अंतःकरणाने जिथे
दिलखुलास बहरत जायचं

दुःखाच्या असह्य झळा
वाटतात इथेच शांत
आस मैत्रीच्या सावलीची
जिथे बसते मी निवांत

असा अनोखा रंग हा
जो पुरेल जन्म सारा
आस सावलीची अश्या
नसतो जिथे द्वेषास थारा.

*सौ अनुराधा भुरे,नांदेड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌷🚩➿➿➿➿
*आस सावलीची*

बाबांच्या डोळ्यात आस
आईच्या प्रेमळ सावलीची
नको बंधनात आपुलकी
निर्मळ आस सावलीची

दादाच्या डोळ्यात आस
यशस्वी होण सावलीची
ताईच्या अंगी हे सद्गुण
भावना प्रेमळ माऊलीची

गुरूचा आशीर्वाद अखंड
मिळतो याच शिष्याला
दिसे हृदयी आस अशी
आस आई सावलीची!

माया ममता समाधान
आईने दिले मला आंदण
आस तिच्या सावलीची
माझ्या पाठीवर हे चांदणं

गोंदन तळहातावर दिसे
आनंदी मनसोक्त जगणं
नको वंचीत मनासारखं
उधाण आस सावलीची

नको आता या पुढं असं
मन मारून खोटं जगणं
बाबांचा आदर्श जपुन
आस सावलीची बघणं!

*श्री अशोक मोहिते*
*बार्शी जिल्हा सोलापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌷🚩➿➿➿➿
*आस सावलीची*

आस सावलीची
दिसे मज कळस
घेऊनिया आलो
भक्तीची हि तुळस

दंग भजनी किर्तनी
हाती टाळ नि मृदंग
मुखी एकच नाम
पांडुरंग पांडुरंग

सोडूनी हा प्रपंच
भेटीस तुझ्या माऊली
देता दर्शन मजसी
जीवनी लाभे सावली

झाला जन्म सार्थकी
पायाशी टेकविता माथा
मायेची मिळाली सावली
धन्य झालो पंढरीनाथा

छंद तुझ्या भक्तीचा
निरंतर राहो देवा
मागणे माझे एवढेच
नसावा कसलाच हेवा

*कुशल डरंगे, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌷🚩➿➿➿➿
*आस सावलीची*

वणवण जीवनाची
घालमेल मनाची
थोड्याथोडक्या संकटात
आस सावलीची

नसे स्थिर मन
भरती चंचलतेची
मन उदास असे
आस सावलीची

स्वावलंबन हरवले
फेरी दुष्ट चक्राची
घाबरला हा देह
आस सावलीची

दाह हा जीवनी
ओढ शितलतेची
नको वाटे उन्हाळा
आस सावलीची

उभा रहा मानवा
पावती दे सोशिकतेची
क्षणाक्षणास का तुज
आस सावलीची

सुख दुःख च रे जीवन
ठेव जाणिव सत्यतेची
का मोह सदा अन्
आस सावलीची

*देशमुख शर्मिला शिवाजी, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🌷🚩➿➿➿➿
*आस सावलीची*

नको देवा अंत पाहू
जे जे दुःख वाट्याला आले
कर्माचे जसे तसे भोग
अपार जीवनात अनेक आले

आयुष्यात कितीतरी असे
डोंगर वाट्यात आलेत
वादळ तुफान एकामागून
कितीदा चक्रव्यूहात सापडलेत

पंढरीच्या देवा विठुराया
आहे विश्वास तुझ्यावरी
तुच आमचा आहेस कैवारी
आस सावलीची मागतो हरी

सोसले हाल परीस्थितीने
आता उन्हाचे चटके नकोत
भक्तिभावाने तुज स्मरते देवा
आस सावलीची लागलीत

*सौ पुष्पा डोनीवार चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🚩🌷🚩➿➿➿➿
*आस सावलीची*

जन्म देऊन तू ग आई
गेलीस मला सोडूनी
आस सावलीची माझी
हिसकावली विधात्यानी

तुझ्या कुशीची ग
उब हवी होती मला
नियतीने ग बाई
आपलाच डाव खेळला

तानुल्याच्या किचांळीची
दया नाही ग आली
आई विना ग पाखरू
एकटं ग पडली

आस हवी होती मला
तुझ्या पद-याच्या सावलीची
सर नाही येत कुणाला
माझ्या त्या मायेची

जन्म माझा होताच ग
तू झालीस प्रिय देवाला
अपराध माझा काय झाला
पांढ-या पायाची म्हणून हिनवतात मला

तुझ्या विना आहे
जीवन माझे अधूर
तुझ्या स्मृतीने ग
भरून येतो ग उर…
भरून येतो ग उर….

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🚩🌷🚩➿➿➿➿
*आस सावलीची*

बाय माझी रूसली
खोलीत जाऊन बसली ॥१॥

खेळायला ती आसुसली
आस बाहुलीची धरली ॥२॥

गालाच्या फुग्यात फुगली
हळुंच जाऊन लपली ? ॥३॥

नाजुक खळीत हसली
फुगा फुटुन बोलली ॥४॥

हवे मला एक सुंदर बाहुली
तिच्यासवे खेळीन भातुकली ॥५॥

गोऱ्या गाली लाली फुटली
खुदकन् कळी गाली फुलली ॥६॥

गोबऱ्या गाली आली लाली
परी गोड हसूं लागली ॥७॥

थांब म्हणत तेथून पळाली
आणि लाजुन म्हणाली ॥८॥

लुटुपुटुचा संसार मांडीन
मजेत भातुकली खेळीन ॥९॥

लाडुलीचे लगीन लावीन
गोऱ्या राणीला वर शोधीन ॥१०॥

पाहुन तो हसेल बिलंदर
गेली खुशीत फिराया दूर ॥११॥

मनी फटाके फुटु लागले
बघून सारे मुक्त हसले ॥१२॥

आस सावलीची मनी धरली
आईसाठी दोघ परतून आली ॥१३॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles