
“सुंदर दृष्टी – निरंतर सृष्टी “या उपक्रमांतर्गत पाच हजार लोकांना चष्मे वाटप
_आणखी पंचेचाळीस हजार लोक घेणार या उपक्रमाचा लाभ : भगवान गुरव_
सुभाष चौगले,कुडूत्री(प्रतिनिधी)
कोल्हापूर: अनंतशाती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात अनेक उपक्रम राबवून समाजसेवा साधली आहे.नुकतेच संस्थेच्या माध्यमातून एक महिन्याच्या काळात ५००० गरजू लोकांना दृष्टीदान या उपक्रमांतर्गत चष्मेवाटप केले आहे. आणखीन ४५००० हजार लोकांना या उपक्रमांचा लाभ शिबिराच्या माध्यमातून मिळवून देणार असल्याचे अनंतशांतीचे संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव यांनी ‘बिनधास्त न्युज’शी बोलताना सांगितले.
गेल्या तेरा वर्षांच्या काळात संस्थेने विविध क्षेत्रात भरीव कार्य केले असून ग्रामीण, डोगंराळ दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहचविण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. शिवाय कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी संस्थेला दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्डने सन्मानित केले आहे. दुर्गम आणि डोगंराळ भागातील जनतेला तातडीची आरोग्य सेवा पुरविणे तसेच मोबाईल व्हॅन मार्फत अत्यल्प दरात आरोग्य सुविधा पुरविणे, आरोग्य हेल्पलाईन मार्फत वेगवेगळ्या साथीच्या आजारावर वेळोवेळी मार्गदर्शन करणे, अशा अनेक उपक्रमांना अनुसरून गेल्या महिनाभरात दृष्टीदान दिनानिमित्ताने दृष्टीदान पधंरवडा साजरा करताना व्हिजन स्प्रिंग फौडेशन यांच्या सहकार्याने व डॉ शितल सिरसाठ, गणेश चिकणे, गोपाळ पानभरे, प्रशांत भुसारी,यांच्या संयोजनाने अनंतशाती सामाजिक सेवा संस्था संस्थापक भगवान गुरव, अध्यक्ष डॉ.माधुरी खोत, सचिव अरुणा पाटील,संचालक जे. के. गोरंबेकर, रसुल शेख,राधानगरी- भुदरगड अध्यक्ष सुभाष चौगले यांच्या सहकार्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रात सुंदर दृष्टी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
दृष्टी दान व मोफत नेत्र तपासणी उपक्रमांतर्गत तपासणी व अवघ्या साठ रुपयात चष्मा देऊन गरजूंना सेवा दिली आहे. आजअखेर ५००० हजारहुन अधिक लोकांना या योजनेचा लाभ घेतला असुन आणखीन ४५००० हजार लोकापर्यंत हा उपक्रम पोहचविण्याचा संकल्प आणि ध्यास संस्थेने घेतला आहे