माजी सरपंच संतोष कटरे यांचा आदमी पक्षात प्रवेश

माजी सरपंच संतोष कटरे यांचा आदमी पक्षात प्रवेश



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर :- आम आदमी पार्टी प्रभाग क्रमांक ३८ जयताळा दक्षिण पश्चिमच्या वतीने कार्यकर्ता मेळावा, पक्ष प्रवेश, मोहल्ला समिती टीम नियुक्ती चा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. मुसळधार पाऊस सुरु असतांना सुध्दा स्थानिक नागरिक व आम आदमी पार्टी विदर्भ संयोजक डॉ. देवेंद्र वानखेडे, महाराष्ट्र कोषाध्यक्ष श्री. जगजीत सिंग महाराष्ट्र आय. टी. सेल प्रमुख श्री. अशोक मिश्रा नागपुर शहर संयोजिका श्रीमती कविता सिंघल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी माजी सरपंच ग्राम पंचायत ईसासनी संतोषभाऊ कटरे यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश घेतला, तसेच जयताळा, शिवणगांव, एकात्मता नगर, रमाबाई आंबेडकर नगर येथील अनेक स्थानिक नागरिकांनी पक्षात प्रवेश घेतला ज्यांमधे सुनिता खोब्रागडे, दिनेश मेश्राम, प्रमोद वाघमारे, सुभाष शेंद्रे, अंकीत द्रव्यकर, सौ. रोहिणी संजय धोंगडे, सौ. प्रतिभा विक्रम कार्की, सौ. कांची थापा, सौ. राजकमल खोब्रागडे, सौ. नुतन खडसे, मुन्नी पटले, सौ. मेघा कुकडे, धनराज मेश्राम, क्रिष्णा सोनेकर, रवि वर्मा, अमोल सावरकर, संदल सुनाम, विजय चौव्हाण मुख्यत सहभागी होते, आम आदमी पार्टीचे दक्षिण पश्चिम विधानसभा सचिव श्री. विनोद अलमडोहकर, सहसंयोजक व प्रभाग ३८ चे निवडणुक प्रभारी श्री. सुरेश खर्चे, प्रभाग क्रमांक ३९ चे संयोजक श्री. शिरीष तिडके काका, सुरेशभाऊ आदमने,सुषमा कळमकर,देवेंद्र परीहार, हेमंत भुजाडे, ऋषिकेश नागोसे, नीलेश गडेकर, सुदर्शन शिव आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश आहे.

याप्रसंगी मोहल्ला समित्या गठीत करुन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले, ज्यात रमाबाई आंबेडकर नगर जयताळा मोहल्ला समिती संयोजिका म्हणुन कु. अनविया सुनाम यांची नियुक्ती करण्यात आली, विक्तू बाबा नगर शिवणगाव मोहल्ला समिती संयोजिका पदी सौ. अनिता काळे व सचिव पदी सौ. गीता रामदास तायवाडे यांची नियुक्ती करण्यात आली, शिवणगांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मोहल्ला समिती संयोजिका पदी सौ. जुगनु धनराज मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली.

भर पावसात या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आम आदमी पार्टीचे प्रामुख्याने उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागातील स्थानिक नागरिकांचे मनपूर्वक आभार
सचिन लोणकर अध्यक्ष – जयताळा वार्ड, दक्षिण पश्चिम विधानसभा आम आदमी पार्टी नागपूर यांनी व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles