अभ्यंकर नगरात वाहतुक धोक्यात ; पथदिवे बंद,अतिक्रमणाचा सुळसुळाट

अभ्यंकर नगरात वाहतुक धोक्यात ; पथदिवे बंद,अतिक्रमणाचा सुळसुळाटपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: दक्षिण पश्चिम मतदार संघ येथील अभ्यंकर नगर ते गांधी नगर मार्गावर पथदिवे नसल्या कारणाने अपघात होत असून नागरिकांना सायंकाळी ये- जा करण्यास खुप त्रास सहन करावा लागत आहे व या मार्गावर मोठ्या प्रमाणावर फुटपाथवर अतिक्रमण आहेत. नुकताच अतिक्रमणामुळे एका व्यक्तीचा स्टार बस खाली येऊन जागीच मृत्यू झाला होता. स्टार बस फोडण्यात आली. अश्या गंभीर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शासनाने अतिदक्षता घ्यावी आणि मनापाने येथील फुटपाथवर दिवासोंदिवस वाढणारे अतिक्रमण पुर्णतः हटविण्यात यावे व भविष्यात पुढे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

या मार्गावर पथदिव्यांची व्यवस्था नीट नाही आहे, असलेले पथदिवे बंद अथवा झाडांच्या फांद्यांनी झाकलेले असतात. पथदिव्यांची संख्या सुध्दा कमी आहे त्यामुळे हा रस्ता सायंकाळी कायमस्वरूपी अंधारात असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढलेली आहे, महिलांना रात्रीच्या वेळीने या मार्गाने जाणे भीतीचे ठरत आहे. त्यामुळे तत्काळ या मार्गावर नियोजन पूर्वक पथदिवे लावण्यात यावे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनातर्फे मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी आणि शहर अध्यक्ष अजय ढोके यांच्या मार्गदर्शनात महिला सेनेच्या विभाग अध्यक्षा रचना गजभिये यांच्या नेतृत्वात लक्ष्मीनगर झोन मनपा विभागातील सहाय्यक आयुक्त सौ.किरण बगडे यांना निवेदन देण्यात आले व चर्चा करण्यात आली.

निवेदनाचे गांभीर्य ओळखून सहाय्यक आयुक्त मॅडम यांनी याबाबत लगेच कारवाई करू असे आश्वासन मनसे महिला सेनेच्या शिष्टमंडळाला दिले. याप्रसंगी सोनू मेश्राम, वैशाली फुलझेले, अनु सहारे, स्मिता वाघमारे व अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. महिला द.प.विभागाच्या अध्यक्षा रचना गजभिये यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles