खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसप्रित्यर्थ पोलादपूर येथे पाककला स्पर्धा

खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसप्रित्यर्थ पोलादपूर येथे पाककला स्पर्धापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_मंजुषा साबळे विजेत्या, रूपाली लवंगारे द्वितीय तर अक्षदा खेडेकर तृतीय_

सचिन पाटील, अलीबाग

रायगड: लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये गुरूवारी महिलांसाठी पाककला स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला तालुक्यातून शेकडो स्पर्धक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि मैत्रीणी,भगिनी, मातांच्या उदंड प्रतिसादाने मुख्य आयोजिका तथा जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रतिमा अभंग जाधव भारावल्या. या पाककला स्पर्धेमध्ये मंजुषा साबळे यांनी सर्वोत्तम पाककृती सादर करून विेजेतेपदाचा मायक्रोवेव्ह ओव्हन हे पारितोषिक प्राप्त केले तर आगळीवेगळी रेसिपी बनवून रूपाली लवंगारे या महिलेने उपविजेतेपदाचे वॉटर प्युरिफायर पारितोषिक प्राप्त केले आणि अक्षदा खेडेकर या तरूणीने तृतीय क्रमांकाचा मिक्सर ग्राईंडर बक्षीस मिळाला.

रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खासदार सुनील तटकरे मित्र मंडळामार्फत नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून पोलादपूर तालुक्यातही पाककला स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार मांडल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई बुटाला यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आशीर्वाद दिले आणि एवढया भव्य प्रमाणात आणि प्रचंड उपस्थितीत ही स्पर्धा होईल अशी अपेक्षाही नसताना उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रतिमा अभंग जाधव यांनी सर्वांना मनोमन धन्यवाद दिले.

पोलादपूरच्या तहसिलदार दिप्ती देसाई यांनी, पावसाचा जोर वाढला असताना या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल, अशी शंका असतानाही आले आणि शेकडो महिला स्पर्धकांच्या उपस्थितीत ही स्पर्धा होत असल्याचे पाहून एवढया महिलाभगिनींना भेटण्याची संधी मिळाल्याचा आनंद झाल्याचे यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर यांनी, खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक प्रमुख पदाधिकारी खा.तटकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी सुतारवाडीला गेले असल्यामुळे त्याचदिवशी पाककला स्पर्धेचे आयोजन शक्य नव्हते. मात्र, तरीदेखील मोठया संख्येने उपस्थित राहून महिलांनी स्पर्धा यशस्वी केल्याने भविष्यात महिलाविषयक उपक्रम राबविण्याकडे आपला अधिक प्रयत्न राहिल, असे मत मांडले.

यावेळी व्यासपिठावर पोलादपूरच्या तहसिलदार दिप्ती देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर, सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुहास मोरे, तालुका अध्यक्षा प्रतिभा पवार, बाळकृष्ण जाधव, बारकू शिंदे, शहरअध्यक्ष अजित खेडेकर, बाळकृष्ण चव्हाण, भाई पाटेकर, पार्टे तसेच मीरा लाड आदी पदाधिकाऱ्यांसह माजी राज्यमंत्री आ.अदिती तटकरे यांनी पाठविलेले पाककला स्पर्धा परिक्षक अमितकुमार हे उपस्थित होते. यावेळी अभंग जाधव आणि कांचनताई बुटाला तसेच सुप्रिया शेठ यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी पोलादपूर शहर तसेच ग्रामीण भागातील महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहून अतिशय वेगवेगळया पदार्थांची आकर्षक मांडणी व सजावट करून स्पर्धेत सहभाग घेतल्याने पाककला स्पर्धा परिक्षक अमितकुमार यांना अनेक पदार्थांची चव घेण्याचा तसेच रेसिपी जाणून घेण्याचा मोह आवरला नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles