
आर्ट ऑफ लिव्हिंग -नशा मुक्ती वेलनेस तर्फे रविवारी शिबीराचे आयोजन
नागपूर: ग्रेस व्यसन मुक्ती केंद्र बुटीबोरी यांच्या अंतर्गत नागपूर मध्ये रविवार दि.17 जुलै रोजी, आर्ट ऑफ लिविंगच्या सौजन्याने पीडीत लोकांना आधुनिक व नैसर्गिक, पद्धतीनुसार ग्रेस व्यसन मुक्ती केंद्रा च्यावतीने शिबिराचे आयोजन केले आहे.
आयोजित शिबिरात मनोचिकित्सक, ध्यान व योगा शिक्षकांच्या वतीने उपचार केले जातील. या शिबिराचे केंद्र संस्थापक डॉ. अर्चना भारती यांनी पीडित लोकांना या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.