Home गावगप्पा देवळी काळपांडे येथील पुलाची दयनीय अवस्था

देवळी काळपांडे येथील पुलाची दयनीय अवस्था

50

देवळी काळपांडे येथील पुलाची दयनीय अवस्थापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

हिंगणा -हिंगणा विधानसभा क्षेत्रातील देवळी (काळबांडे) येथील बांधण्यात आलेला पुल हा तसा बघितला तर नविनच आहे. परंतु अधिकारी यांच्या चुकीच्या धोरणामुळे या पुलाची फार अशी दुर्दशा होताना दिसत आहे.की या पुलाच्या बाजूला सादे बँरेकेटस सुध्दा संबंधित विभागा कडून लावण्यात आलेले नाही.

यामुळे या गावातील लोकांना मरण यातना सोसाव्या लागत आहे. याबाबत अधिका-याना व जनप्रतिनिधिना अनेकवेळा गावकऱ्यांच्या वतीने विनंत्या केल्या, परंतु यांना कधीच जाग आली नाही, दि.13.7.2022 ला बोर नदीला पूर येऊन 5 ते 7 तास देवळी(काळबांडे ) ता.हिंगणा या गावाचा संपर्क पूर्ण तुटला होता. अशी माहिती दिलीप काळबांडे (पाटील ) संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा यांनी दिली आहे.