
अनिल परबांच्या अडचणीत होणार वाढ; केंद्राच्या पथकाकडून रिसॉर्टची पाहणी
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची सहा जणांचे पथक मुरुडमधील रिसॉर्टवर गुरुवारी दिवसभर पाहणी करण्यासाठी दाखल झाले होते. पथकामध्ये या चैन्नईमधील पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे. पर्यावरणाच्या हानीची आत्तापर्यंत काय कारवाई झाली ? याची या पथकाकडून चौकशी सुरू आहे.
सहा जणांच्या पथकाकडून ही चौकशी सुरू आहे. गुरुवारी मुरुड येथील साई रिसॉर्टच्या ठिकाणी जाऊन या पथकाने पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांत, तहसीलदार, सर्कल तलाठी हे महासुलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अनिल परब यांच्या मुरुडमधील साई रिसॉर्टकडून सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे.
*रिसॉर्टची चौकशी सुरू…*
या प्रकरणी अनेक आरोप सोमय्या क यांनी केले आहेत. हे पथक साई व रिसॉर्टप्रमाणे सी कोच रिसॉर्टची देखील करतेय अशी प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली. सायंकाळी उशिरा ही टीम दापोली प्रांताधिकारी कार्यालयात दाखल झाली होती. माहिती घेण्याचे संध्याकाळी उशीरापर्यंत सुरू होते. दरम्यान, यापूर्वी अनेकदा अनिल परब यांनी सोमय्या यांनी केलेले आरोप फेटाळून लावत आपला साई रिसॉर्टजवळ कोणताही संबंध नाही, असे यापूर्वी परब यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.