डाॅ. प्रकाश घवघवे यांच्या सहाव्या पुस्तकाचे प्रकाशन

डाॅ. प्रकाश घवघवे यांच्या सहाव्या पुस्तकाचे प्रकाशन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: अमरावतीच्या छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाल्याबद्दल कृषितज्ज्ञ डाॅ. ‌प्रकाश घवघवे यांचा सत्कार, त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि त्यांचा 79 वा वाढदिवस, असा त्रिवेणी संगम असलेला सोहळा धरमपेठेतील सुगंध सभागृहात नुकताच पार पडला.

तीन कृषी विद्यापीठांचे माजी कुलगुरू डाॅ. सुभाष पुरी अध्यक्षस्थानी होते. डाॅ. लक्ष्मीकांत कलंत्री, डाॅ. प्रशांत रहाटे, डाॅ. मंगेश देशमुख, डाॅ. नरेशचंद्र काठोळे, डाॅ. सनी अवसरमल, डाॅ. अरविंद धोपटे, डाॅ. वसंतराव कुबडे हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

डाॅ. घवघवे लिखित ‘प्रकाशझोत 6’ हे सहावे पुस्तक याप्रसंगी प्रकाशित करण्यात आले. तसेच त्यांचा 79 वा वाढदिवसही साजरा करण्यात आला.‌ स्मिता खनगई यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर दीपाली अवसरमल यांनी आभार मानले.

यानिमित्ताने लेखक मधुकरराव हुद्दार, योगाचार्य विठ्ठलराव जिभकाटे, माजी आमदार यादवराव देवगडे (तिघेही नव्वदीच्या वर), शेतकरी नेते अरविंद नळकांडे, डाॅ. मनोहर पशिने, पत्रकार विनोद देशमुख, ट्रॅफिक पार्कचे वर्गीस, निसर्गोपचार तज्ज्ञ प्रा. हेमंत देशमुख, डिझायनर राजेश काळे, प्रिंटर विनोद आठवले, शिक्षिका शुभांगी घवघवे, स्मिता खनगई आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles