
सोमवारपासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनास तूर्तास स्थगिती
मुंबई: सोमवार १८ जुलैपासून होणा-या विधिमंडळाच्या अधिवेशनास तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. संसदीय कार्य विभागाने विधानमंडळ सचिवालयाला याबाबत सूचित केले आहे. याबाबतचे पत्र सर्व सदस्यांना पाठवण्यात आले आहे. अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल असंही या पत्रकात म्हटले आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार १८ जुलै २०२२ पासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार होते. पण संसदीय कार्य विभागाच्या सूचनेनूसार हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र अधिवेशनाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नसून संसदीय कार्य विभागाने कळवल्यानंतर पुढची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं विधिमंडळाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अधिवेशन घेतले जाण्याची शक्यता असल्याचे समजते.