

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई एकरी दहा हजार द्या
_जिल्हाधिका-यांना क्षात्रवीर सेना मारेगाव तर्फे मागणीचे निवेदन_
अनिल पारखी
मारेगाव: तालुक्यात मागील दहा दिवस झालेल्या पावसाच्या आतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर येऊन पाणी जमा झाले. अनेक शेतकऱ्यांच्या मालाचे व घरांचे नुकसान झाले. तिहेरी पेरणी करावी लागणार असे चित्र स्पष्ट दिसत आहे . तात्काळ नुकसान भरपाई द्यावी असे छावा क्षात्रविर सेना मारेगाव तर्फे जिल्हाधिकायांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
पूरस्थितीने बिकट अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतातील उभे पिके खराब झाले आहे. अगोदरच दुबार पेरणी केल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती वाईट बनली असतांना त्यात पुन्हा पावसाच्या रूपाने अस्मानी संकट कोसळले आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ आली असल्याने शासनाच्या वतीने तत्काळ झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई एकरी दहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मागणी पूर्ण न झाल्यास छावा क्षात्रविर सेनेच्या वतीने शेतकरी व नागरिकांच्या भरपाई साठी तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा छावा क्षात्रविर सेनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल पारखी,व विदर्भ महीला अध्यक्ष प्रतिभा ताई तातेड यांनी दिला आहे.
यावेळी यांच्या छावा क्षात्रवीर सनेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री समाधान दादा सुरवसे, यांच्या मार्गदर्शनाखाली , विदर्भ अध्यक्ष विलास बूराण ,जिल्हा अध्यक्ष सतीश पारखी , जिल्हा उपाध्यक्ष अजय धांडे,तालुका अध्यक्ष अनंता घोटेकर, महीला तालुका अध्यक्ष सौ मंजुषा पेंदोर, पृथ्वीराज घोटेकर, अभिषेक उपरे, संकेत लांबट व अजय लांबट कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.