वर्ल्ड स्केटर्ससाठी भारतीय संघात जान्हवीची निवड अर्जेंटिनामध्ये पदकाची आशा

वर्ल्ड स्केटर्ससाठी भारतीय संघात जान्हवीची निवड अर्जेंटिनामध्ये पदकाची आशा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_जान्हवीसाठी तिची आईच बनली गुरू_

क्रीडा विशेष प्रतिनिधी, सतीश भालेराव

नागपूर : परिस्थिती कशीही असो, तुम्हाला क्रीडा क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, जिद्द, चिकाटी आणि समर्पणवृत्ती हे तीन गुण तुमच्यात असणे खूप आवश्यक आहे. नागपूरची प्रतिभावान स्केटर जान्हवी कडू हे याचे उत्तम उदाहरण आहे. नियतीने वडिलांचे छत्र हिरावून नेल्यानंतर आईने पिता आणि माता बनून आपल्या मुलीला घडविले. मुलीनेही आईच्या परिश्रमाचे चीज करत थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली.

२० वर्षीय जान्हवीची येत्या २४ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान ब्युनॉस आयर्स व सॅन जुआन (अर्जेंटिना) येथे होणाऱ्या वर्ल्ड स्केटर्स गेम्ससाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय रोलर स्केटिंग महासंघातर्फे विशाखापट्टणम येथे आयोजित निवड चाचणीत तीन सुवर्णपदके जिंकल्यानंतर जान्हवीला भारतीय संघात स्थान मिळाले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच देशाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने जान्हवी खुश आहे. पण त्याचवेळी अपेक्षेचे थोडेफार दडपणही आहे. मात्र कशाचीही चिंता न करता स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून देशासाठी पदक जिंकण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तिने सांगितले. जान्हवी स्पर्धेच्या तयारीसाठी सध्या हरियानाचा राष्ट्रीय विजेता सचिन सिंगच्या मार्गदर्शनाखाली चंदीगडमध्ये सराव करीत आहे.

इतर खेळाडूंप्रमाणे जान्हवीचीही कहाणी संघर्षपूर्ण आहे. नारायणा स्कुलमध्ये शिकत असताना वयाच्या नवव्या वर्षी ती स्केटिंगमध्ये आली. जान्हवीच्या आईनेच (वैशाली) तिला स्केटिंगचे प्राथमिक धडे दिले. जान्हवीची जिद्दीने वाटचाल सुरू असताना वडिलांचा (विजय कडू) यांचा २०१७ मध्ये अपघाती मृत्यू झाला. हा जान्हवीसाठी फार मोठा मानसिक धक्का होता.

मात्र ब्युटी पार्लर चालविणाऱ्या वैशालीने त्यांची पोकळी भरून काढत गुरू आणि आई अशी दुहेरी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून तिला या धक्क्यातून बाहेर काढले. त्यानंतर जान्हवीने कधीच मागे वळून पाहिले नाही. जिल्हा, विभागीय, राज्य व आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत थेट भारतीय संघात स्थान मिळविले.

नागपूरच्या धरमपेठ सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या जान्हवीने गेल्या १०-१२ वर्षांमध्ये विविध स्पर्धांमध्ये ६५ च्या वर पदके जिंकली आहेत. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिच्या नावावर एका सुवर्णासह चार पदके आहेत. तिच्या शोकेसमध्ये केवळ आंतरराष्ट्रीय पदकाची कमतरता आहे. जान्हवीची मेहनत लक्षात घेता लवकरच तिच्या शिरपेचात आंतरराष्ट्रीय पदक खोवले जाईल, याबद्दल अजिबात शंका नाही. जान्हवीचे तेच स्वप्नही आहे.

‘ती’ देशासाठी पदक मिळवेल; डॉ. उपेंद्र वर्मा

मी गेल्या अनेक वर्षांपासून जान्हवीला जवळून पाहात आहे. तिच्यात जबरदस्त टॅलेंट आहे. मुख्य म्हणजे ती मेहनती आहे. खेळाप्रती तितकीच प्रामाणिक आणि समर्पित आहे. त्यामुळे भविष्यात निश्चितच ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी पदक मिळवेल, अशी मला खात्री आहे.
-डॉ. उपेंद्र वर्मा, सचिव, नागपूर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles