Home नागपूर सातगाव किन्हाळा येथील धम्मज्योती बुद्ध विहारात धम्मदेसना व सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

सातगाव किन्हाळा येथील धम्मज्योती बुद्ध विहारात धम्मदेसना व सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

77

सातगाव किन्हाळा येथील धम्मज्योती बुद्ध विहारात धम्मदेसना व सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा – महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे आचरण करण्यासाठी आषाढ पोर्णिमा , धम्मचक्र पोर्णिमा निमित्य पुज्य भदंत धम्मानंद यांची धम्मदेसना व दिनेश हनुमंते, अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा महाराष्ट्र राज्य याचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन व बहुजन समाज पार्टी माजी नागपूर जिल्हा सचिव सतिश शेळके यांच्या नेतृत्वात धम्मज्योती बुध्दविहार येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे प्रविणा शेळके उपसरपंच सातगाव तसेच उपस्थित अरविंद बोरकर, ज्ञानेश्वर सुके, रवींद्र वानखेडे, प्रदीप पाटील, माला शेळके, करुणा मानवटकर, मंगला बोरकर, निलीमा भोंगाडे, प्रेमीला कांबळे, संगीता मेश्राम, मिनाक्षी शेळके, हिना शेळके,अंतकलाबाई शेळके, यशोदा कांबळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आयोजक वैशालीताई पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन स्फूर्ती पाटील व आभारप्रदर्शन उन्नती ढाकणे यांनी केले.