क्षयरुग्णाच्या मदतीस धाऊन आले पं.स. सदस्य लिलाधर पटले.

क्षयरुग्णाच्या मदतीस धाऊन आले पं.स. सदस्य लिलाधर पटले.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर प्रतिनिधी

हिंगणा-राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांना DOTS Centres माध्यमातून औषधोपचार मोफत मिळत असतो. परंतु गरीब निर्धन असलेल्या क्षयरुग्णांना आजारातून बरे होण्याकरिता पुरेसा सकस व प्रथिन युक्त आहार मिळत नसल्याने शरीरबळ आजार दुरुस्तीला पूरक ठरत नाही.

या करिता राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत Community Support माध्यमातून समाजातील विविध स्तरातून मदत मिळवून क्षयरुग्णांना सहायता मिळावी करिता उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत मदतदारांकडून एक वर्षाकरिता, दोन वर्षाकरिता व तिन वर्षाकरिता प्रथिन युक्त आहाराची मदत किंवा प्रथिन सप्लीमेंट्स ची मदत देण्याचे प्रावधान व त्याची शासकीय पोर्टलला एन्ट्री करण्यात येणार. अशा पद्धतीची ही योजना असून या मदतदारांचे नाव ‘क्षयरुग्ण मित्र’ म्हणून शासकीय पोर्टलवर नोंदविण्यात येणार.

या योजने अंतर्गत हिंगणा तालुक्यात पंचायत समिती सदस्य श्री. लिलाधरजी पटले यांच्याकडून 3 रुग्णांना वर्ष भराकरिता प्रथिनयुक्त पावडरची मदत देण्यात आली असून तालुक्यातून पहिल्यांदा या रुग्णांना प्रतिनियुक्त आहाराची मदत त्यांच्या आजारातून बरे होण्यासाठी प्राप्त झालेली आहे व ईतर अनेक मदतदारांनी या माध्यमातून क्षय रुग्णांना मदत करण्याचे आश्वासन दिले असून बहुतांश गरजू क्षयरुग्णांना या उपक्रमामाध्यमातून क्षयरोगातून लवकर बरे होण्यास मदत होणार.
याच धर्तीवर हिंगणा पंचायत समितीच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे यांच्याकडून सर्व सन्माननीय सदस्य गण व उपस्थित अधिकारी कर्मचारी वर्गांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले असून पंचायत समिती सदस्य श्री. लिलाधरजी पटले यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles