पिंपळा शाळेने केले विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे कमी…!!!
परभणी: शाळा म्हटले कि दफ्तर आले व दफ्तरात पुस्तके व वह्या आल्या!त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे वाढले!दफ्तराचे ओझे विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १०% पेक्षा अधिक असू नये असे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दिनांक २१ जुलै २०१५ च्या शासन निर्णयात नमूद केले आहे.त्याच शासन निर्णयानुसार पालकांनी-शाळेने व पर्यवेक्षीय यंत्रणेने काय करायला हवे हे सुद्धा नमूद केले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळा केंद्र टाकळी कुंभकर्ण शाळेच्या शिक्षकांनी दफ्तराचे जवळपास ५०% ओझे कमी केले आहे.समग्र शिक्षा अंतर्गत वर्ग १ली ते ८वी मध्ये शिकणाऱ्या सर्व बालकांना दरवर्षी १००% मोफत पाठ्यपुस्तके वितरित केले जातात.वर्ग सातवीच्या एका विद्यार्थीनीनी पुस्तकाच्या ओझ्याबाबत अडचण व्यक्त केल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी मागील वर्षी व त्या अगोदर वाटप केलेले सर्व जुनी पुस्तके जमा करून प्रत्येक विद्यार्थ्यांना जुन्या पुस्तकांचा अजून एक सेट देण्यात आला.विद्यार्थ्यांना एक सेट घरच्या अभ्यासासाठी घरीच ठेवण्याचे सांगून एक सेट विद्यार्थ्यांना निस्चित करून दिलेल्या त्यांच्या जागेवर(बेंचच्या खाली)शाळेतच ठेवण्याचे सांगण्यात आले.मागील एक महिन्यापासून कुठलीही तक्रार आलेली नसून हा प्रयोग जवळपास यशस्वी झाल्याचे लक्षात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे पाठीवरील ओझे कमी केल्याचे समाधान प्राप्त होत आहे.