
चिखल तुडवीत ईसासनीत पोहोचवली मृतकाच्या वारसास आमदार मेघे यांनी 8 लाखाची मदत
गजानन ढाकुलकर
हिंगणा – तालुक्यातील भीमनगर ईसासनी येथील रहिवासी श्रीमती सुकवन राधेलाल मातरे वय 42 वर्ष आणि कु. अंजली राधेलाल मातरे वय 18 वर्ष या व्यक्ती भीमनगर ईसासनी भागातून वाहत असलेल्या नाल्यातील पुरात वाहून दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या परिवाराचे वारस श्री. राधेलाल उमेश मातरे यांना सानुग्रह अनुदान म्हणून प्रती व्यक्ती चार लाख प्रमाणे एकूण आठ लाख रुपये चेक द्वारे हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री समीरजी मेघे यांचे हस्ते आज दिनांक 15/07/2022 रोजी वितरित करण्यात आला.
अनुदान वाटप करताना जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चनाताई गिरी, पंचायत समिती सदस्य सौ. पौर्णिमा दीक्षित, कैलाश गिरी, अनिलजी शर्मा, सरपंच श्री. निलेश उईके, माजी सरपंच संतोष कटरे तहसीलदार हिंगणा सौ.प्रियदर्शनी बोरकर, नायब तहसीलदार श्री,.महादेव दराडे,मंडळ अधिकारी श्री. वैभव राठोड, तलाठी श्री.अरुणकुमार गडपायले,ग्रा.प.सचिव श्री. राजेंद्रजी देशमुख,चंद्रशेखर राऊत,सौ. गीताताई ठाकरे, चंद्रशेखर राऊत , सुशीलकुमार दीक्षित,दादाराव मसराम आदि कार्यकर्ते उपस्थित होते.